मनमाड : पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी येथे घडली. परिसरातील नागरिकांनी या हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केल्यामुळे जीवदान मिळाले. जखमी हरणावर उपचार केल्यानंतर त्याला वनविभाग कर्मचाऱ्यांच्या हवाली करण्यात आले. पानेवाडी गावाजवळ असलेल्या जंगलात मोकाट कुत्र्यांनी हरणावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी हरीण इकडे-तिकडे सैरावैरा पळत होते; मात्र कुत्र्यांनी त्याला पकडून त्याला चावा घेण्यास सुरु वात केली. सुदैवाने सरपंच अंकुश कातकडे, धनराज कातकडे, अक्षय कातकडे, भीमराज कातकडे, वाल्मीक कातकडे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी कुत्र्यांच्या तावडीत हरीण सापडल्याचे पाहून तिकडे धाव घेतली. त्यामुळे हरणाला सोडून कुत्रे पळून गेले. जखमी हरणावर उपचार करण्यात आल्याने प्राण वाचले. सरपंच कातकाडे यांनी वनविभागाच्या अधिकाºयाशी संपर्क साधून त्यांना हरणाची माहिती दिली. अधिकाºयांनी येऊन जखमी हरीण ताब्यात घेतले.भारत बचाव महारथ यात्रा आज मालेगावी मालेगाव : लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्यासाठी निघालेल्या भारत वाचवा महारथयात्रेचे गुरुवारी दुपारी २ वाजता मालेगावी आगमन होत आहे. वेरूळ येथून निघालेली ही महारथयात्रा शहरातील रामसेतू पुलानजीक श्रीराम मंदिराजवळ येणार असून तेथून धुळ्याकडे प्रयाण करणार आहे. यावेळी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, जनार्दन स्वामी वेरूळ आश्रमाचे एस. पी. सिन्हा, कर्नल टी. पी. एस. त्यागी, शामजी महाराज उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरणावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:12 AM