शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भुजबळांच्या दटावणीने जिल्हा परिषदेत धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:52 PM

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व तितकाच संताप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना चांगले कामकाज करण्याची व निधी वेळेत खर्चाची तंबी भरल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांची धावपळ उडाली.

ठळक मुद्देखातेप्रमुखांच्या बैठकांचा जोर : निधी खर्चाचे नियोजन

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व तितकाच संताप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना चांगले कामकाज करण्याची व निधी वेळेत खर्चाची तंबी भरल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांची धावपळ उडाली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाºयांनी सकाळपासूनच बैठकांवर जोर देत वेळेत निधी कसा खर्च होईल यासाठी प्रयत्न चालविले.पालकमंत्री म्हणून नियुक्ती होताच, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जवळपास पाच सव्वापाच वर्षांनंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. दिवसभर चाललेल्या या बैठकीपूर्वी भुजबळ यांनी आपल्यापरीने जिल्ह्णातील एकूणच योजना व त्याची सद्यस्थिती, जिल्हा नियोजन समितीचे कामकाजाची माहिती करून घेतली होती. त्यामुळे या बैठकीत सुरुवातीपासूनच भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीने तरतूद केलेल्या निधीच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे वाभाडे काढले.यापूर्वी गेल्या पाच वर्षांत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकांमध्ये भुजबळ यांच्या इतका बारकाईने आढावा घेतला गेला नसल्याने या बैठकीसाठी आलेल्या अधिकाºयांकडे माहितीची वाणवा असल्याचे पाहून त्यांच्यातील बेफिकिरीचे प्रदर्शन नियोजन समितीच्या बैठकीत झाले. अधिकाºयांना काम करता येत नसेल तर त्यांनी बदली करून घ्यावी असा निर्वाणीचा इशारा देतानाच, जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या खर्चाबाबत प्रशासनाने काय उपाययोजना केल्या त्याचा आढावा घेण्यासाठी पुन्हा आठ दिवसांत बैठक घेण्याचे सुतोवाच केले. विशेष म्हणजे भुजबळ यांच्या पुढ्यात जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीच तक्रारींचा पाढा वाचून अधिकाºयांनाही आरोपीच्या पिंजºयात उभे केल्याची बाब अधिकच गांभीर्याने घेतली गेली. जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा स्वतंत्र फेरआढावा घेण्याचे भुजबळ यांनी जाहीर केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांची धावपळ उडाली आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांनी ज्या ज्या विषयांवर अधिकाºयांना धारेवर धरले त्या सर्व विषयांची माहिती घेऊन सोमवारी सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाºयांनी प्रत्येक खातेप्रमुखांचा आढावा घेतला. सकाळपासून सुरू झालेली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. अधिकाºयांमध्ये विकासकामांची अचानक आलेली तत्परता पाहून काही सदस्यांनी यापूर्वीच वेळेतकामे केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती अशी प्रतिक्रियाही व्यक्तकेली.नवीन सीईओंच्या उपस्थितीत बैठकजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची भंडारा येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी नवीन अधिकाºयांची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे विकास कामे व निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते. ही बैठक सोमवार (दि. २०) होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे पद रिक्तच असल्यामुळे सदरची बैठक नंतर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद