शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

600 धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:52 AM

शहरातील विविध सोसायट्यांच्या मोकळ्या जागेत साकारण्यात आलेली धार्मिक स्थळे नियमित करावी यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडे ठराव पाठविला असून, त्यानुसार तो मंजूर करावा, असे साकडे प्रशासनाने घातले आहे.

नाशिक : शहरातील विविध सोसायट्यांच्या मोकळ्या जागेत साकारण्यात आलेली धार्मिक स्थळे नियमित करावी यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडे ठराव पाठविला असून, त्यानुसार तो मंजूर करावा, असे साकडे प्रशासनाने घातले आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात बुधवारी (दि.२९) शासनाला स्मरणपत्र पाठविले आहे. शासनाने मान्यता दिल्यास सुमारे सहाशे धार्मिक स्थळे नियमित होण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा तणाव टळण्याची शक्यता आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने बेकायदा धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले असून, त्यानुसार आता ६४७ धार्मिक स्थळे बेकायदेशीर ठरविली आहेत. त्यावर महापालिकेने हरकती मागवल्या होत्या. विविध धार्मिक संस्था आणि नागरिकांनी एकूण १८४ हरकती घेतल्या होत्या. त्यावर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तथापि, आता महापालिकेने धार्मिक स्थळे नियमितीकरणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी शासनालाच स्मरणपत्र पाठविले आहे. नगररचना अधिनियमानुसार कोणत्याही सोसायटीच्या खुल्या जागेत दहा टक्के बांधकाम अनुज्ञेय आहे. अनेक खुल्या जागेत अशाप्रकारे धार्मिक स्थळे बांधल्यानंतर विशेष करून महापालिकेनेच त्यासमोर सभा मंडपे स्वनिधीतून बांधून दिली आहेत.नगररचना विभागाकडे पडताळणीची जबाबदारी४महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर धार्मिक स्थळांवरील हरकतींची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर त्यावर कोणताही निर्णय न घेता समितीने यासंदर्भातील सर्व माहिती नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे पाठविली असून, त्यांना पडताळणीची जबाबदारी देण्यात आली आहे.आता आमदारांच्या भूमिकेकडे लक्षमहापालिकेने हरकतींवरील सुनावणी पूर्ण करतानाच राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला दोन वर्षांपूर्वीच्या ठरावाचे स्मरण करून देणारे पत्र पाठविले आहे. म्हणजेच प्रशासनाने आता जबाबदारी झटकली असून, ती शासनाच्या खांद्यावर टाकली आहे. त्यामुळे आता शहरातील तिन्ही आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTempleमंदिर