शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

मालेगावातील ग्रामीण विभागाने केला लसीकरणाचा लाखाचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 7:24 PM

दाभाडी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या निर्देशानुसार काळजीपूर्वक लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेशकुमार निकम यांच्या नियोजनामुळे गावासह थेट खेडे व वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे. आजपर्यंत ग्रामीण भागात सुमारे १ लाख ७३० ग्रामस्थांना कोरोनाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील १ लाख ७३० ग्रामस्थांचे दोन्ही डोस पूर्ण

नीलेश नहिरेदाभाडी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या निर्देशानुसार काळजीपूर्वक लसीकरण सत्र राबविण्यात येत आहे. तालुका आरोग्याधिकारी डॉ. शैलेशकुमार निकम यांच्या नियोजनामुळे गावासह थेट खेडे व वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ मिळत आहे. आजपर्यंत ग्रामीण भागात सुमारे १ लाख ७३० ग्रामस्थांना कोरोनाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.प्रारंभी कोरोना विषयक नियमावलीकडे ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले. लग्नसोहळे गावागावातील आठवडे बाजारातील गर्दी, शहरात विविध कामासाठीची ये-जा वाढल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मोठ्या गावांत कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना आरोग्य यंत्रणेसह ग्रामपंचायत प्रशासनाची दमछाक होत होती. त्यातच रुग्णाच्या संपर्कातील लोक चाचणी करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याने आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागत होती. सुरुवातीला ग्रामीण भागातील नागरिकांचा लसीकरण करण्यासाठीचा सहभाग अल्पसा होता, नागरिकांचा लसीकरणात सहभाग वाढविण्यासाठी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील प्रशासन विभागाच्या सहकार्याने गाव पातळीवर लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचारी, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांच्या मार्फत तसेच ग्रामपंचायतीतर्फे दवंडी देत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना लसीचे महत्त्व पटल्यानंतर लसीकरण करण्यासाठी नागरिक पुढे आले.आरोग्य विभागातर्फे कोरोना संदर्भात जनजागृतीसह लसीकरण मोहीम राबविताना विशेष काळजी घेतली जात आहे. २४ जानेवारी २०२१ पासून सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सत्रास सुरुवात करण्यात आली. त्यात फ्रंट लाईन वर्करचा समावेश करण्यात आला. हे करीत असतांना आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचा वाढलेला विश्वास लक्षात घेता तालुक्यातील सर्वच नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध करून वाढविले आहे. जिल्हास्तरावरून लस उपलब्ध झाल्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी लस घेण्यासाठी रुग्णवाहिकेचे वाहन व चालक दिलेल्या वेळेत लस घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुरक्षित पोहोच करीत असतात. आजमितीस तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ५० उपकेंद्र येथे लसीकरण सुरू केले आहे. तालुक्यातील १४१ गावागावात कोविड लसीकरण सुरू करून तालुक्यात आजपर्यंत १ लाख लाभार्थीना लसीकरण करून लाखाचा टप्पा पार केला आहे. तालुक्यातील सर्वच ऐच्छिक लाभार्थी यांना लसीकरण लवकरात लवकर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व तालुका आरोग्य कार्यालयातील भटू शिंदे, तालुका आरोग्य सहायक देवीदास हिरे, तालुका कार्यक्रम सहायक विजय पवार, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक नंदकिशोर कासार, लेखापाल महेश काटे, तालुका समूह संघटक राजू घ्यार, तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक निमेश वसावे, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक नीलेश पाटील यांचे मोलाचे योगदान लाभत असल्याने ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा लाखाचा टप्पा पार झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल