नाशिक : हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न करणारे, अवैध वाहतूक तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या सात हजार ५५७ बेशिस्त वाहनचालकांवर १५ डिसेंबरअखेर कारवाई करून १५ लाख २० हजार रुपयांचा दंडवसूल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली आहे़पोलीस अधीक्षक संजय दराडे यांंनी महामार्गावरील अपघात तसेच त्यामधील मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुक नियमांंचे उल्लंघन करणारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गासह नाशिक पुणे, औरंगाबाद, गुजरात या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण मोठे असून हेल्मेट व सीटबेल्टबाबत जनजागृती करण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात दंडवसुलीचे आदेश देण्यात आले आहेत़ग्रामीण जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखा, शहर वाहतुक शाखा मालेगाव तसेच पोलीस ठाणेनिहाय वाहतुक पोलीसांनी विशेष मोहिमांद्वारे ही कारवाई केली आहे. यामध्ये विना हेल्मेट व सिटबेल्ट न लावता वाहन चालविणारे, मोबाईलवर बोलणारे, नो पार्किंग झोन, डंंक अॅण्ड डांईव्ह, अवैध प्रवासी वाहतुक तसेच वेगमर्यादेचे पालन न करणाºयांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करून ७ हजार ५५७ केसेस केल्या आहेत़ या बेशिस्त वाहनचालकांकडून १५ लाख २० हजार ८०० रूपयांचा दंडही वसुल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे़
साडेसात हजार बेशिस्त वाहनचालकांवर ग्रामीण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:14 AM
हेल्मेट, सीटबेल्टचा वापर न करणारे, अवैध वाहतूक तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या सात हजार ५५७ बेशिस्त वाहनचालकांवर १५ डिसेंबरअखेर कारवाई करून १५ लाख २० हजार रुपयांचा दंडवसूल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली आहे़
ठळक मुद्देवाहतूक नियमांचे उल्लंघन : १५ डिसेंबरअखेरची आकडेवारी; पंधरा लाखांचा दंड वसूल