येवला : नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, तसेच
महामार्गांवरील अवैध वाहतूक व वाळूची (गौण खनिज) तस्करी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, दि.३१ रोजी पोलीस पथकाने सिन्नर एम.आय.डी.सी. व येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाळूची अवैध तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना सिन्नर व येवला परिसरात गौण खनिजाची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सिन्नर एम. आय.
डी.सी. पोलीस ठाणे हद्दीत पंचाळे गावाच्या शिवारात पंचाळे ते सिन्नर रोडवर अवैधरीत्या वाळू भरून जाणाऱ्या ट्रकवर छापा टाकला. यात वाळू भरलेला ट्रक (एमएच१५ एफव्ही ५३८५)चा चालक गणेश शिवाजी नवले (रा. कोळपेवाड़ी, ता. कोपरगाव) यास ताब्यात घेत
सुमारे १५,५५,३९० रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. चालक व मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत भरवस फाटा ते कोळपेवाडी रस्त्यावर अवैधरीत्या
गौण खनिजाची वाहतूक होत असल्याने पोलीस पथकाने
भरवस फाटा परिसरात वाळूची वाहतूक करणाऱ्या ०३ हायवा ट्रकचालकांवर कारवाई
केली आहे. या छाप्यांमध्ये चालक विलास अशोक नागरे (रा. विंचुर), देविदास निवृत्ती कानडे (रा. लौकी शिरसगाव, ता. येवला) व ज्ञानेश्वर पुंजाहरी
बुरुंगुले (रा. मिरगाव, ता. सिन्नर) तसेच मालकांविरुद्ध
कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वनाथ काकड व पाठक यांनी कारवाई केली असून ट्रकसह वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे.