नांदगावसाठी शनिवारी लस उपलब्ध नव्हती. तरीही लसीकरणासाठी येण्याचा संदेश सोशल मीडियातून प्रसारित झाल्याने लोकांनी गर्दी केली. सकाळी ७ वाजेपासून लोक रांगेत उभे राहिले. त्याचा गैरफायदा घेऊन काहींनी एका कागदावर अनुक्रम टाकून नावे लिहिण्यास सुरुवात केली. सदरचा अनधिकृत प्रकार ११ वाजेपर्यंत सुरू होता व कागदावरची यादी २०० पेक्षा पुढे गेली. परंतु सत्य सांगण्यासाठी आरोग्य विभागाचा एकही माणूस तिथे हजर नव्हता. सोशल मीडियातून लस उपलब्ध असण्याचा मेसेज आल्याने लसीकरणाच्या अपेक्षेने लोक आले होते.
सामाजिक अंतर व मास्कचे नियम धाब्यावर बसवून लोक रांगा लावून व जागोजागी घोळके करून लस येण्याची वाट पाहत उभे राहिले. दरम्यान, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार उदय कुलकर्णी यांना संपर्क केला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.
दरम्यान, हिसवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे लसीकरण अचानक रद्द झाल्याने तिथला ७० लसींचा डोस नांदगावकडे वळविण्यात आला. त्याचा आधार नांदगावला मिळाला. जैन धर्मशाळेचे संचालक रिखब कासलीवाल, नूतन कासलीवाल यांनी आरोग्य विभागाने पुरेसे संख्याबळ व बंदोबस्त दिला नसल्याने गोंधळ झाल्याची प्रतिक्रिया दिली, तर देशात असेच चालले आहे. मी तरी काय करणार, अशी उद्विग्न प्रतिक्रिया तहसीलदार कुलकर्णी यांनी दिली.
ढिसाळ नियोजन अत्यंत वेदनादायी असून, जमलेल्या जनसमुदायामुळे कोरोनाचा शहरात उद्रेक होऊ शकतो. आजच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार झाला तर मोठी किंमत मोजावी लागेल.
- संतोष गुप्ता, माजी नगरसेवक, नांदगाव
इन्फो
चांदोरीत लसीकरणासाठी झुंबड
चांदोरी : संपूर्ण राज्यात लसीकरण सुरू असताना लसीचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण ठप्प झाले होते. निफाड तालुक्यातील चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर मागील २ आठवड्यांपासून लसीकरण ठप्प होते, त्या अगोदर फक्त १०० डोस येत असल्याने अनेक नागरिकांना लसीविनाच माघारी जावे लागले होते. चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तेरा गावे असून, त्यातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र मागील २ आठवडे लस नसल्याने शनिवारी (दि. ८ ) लस उपलब्ध होताच नागरिकांची तोबा गर्दी उसळली. पहाटे ५.३० वाजेपासून नागरिकांनी रांगा लावायला सुरुवात केली होती. मात्र अवघे २०० डोस उपलब्ध असताना दुसरा डोस असलेल्या नागरिकांना यात प्राधान्य देण्यात आले होते. जवळपास ४०० हून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
कोट...
चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीचा अधिक पुरवठा करण्यात यावा व चांदोरी गावाच्या लोकसंख्येचा विचार करता येथे ज्याप्रमाणे मतदानप्रक्रिया राबविली जाते त्याचप्रमाणे प्रभागनिहाय व प्रत्येक प्रभागाला दिवस ठरवून लसीकरण करण्यात यावे. जेणेकरून लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही.
- सिद्धार्थ वनारसे , सदस्य, जिल्हा परिषद
फोटो - ०८ चांदोरी लसीकरण
चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झालेली गर्दी व सामाजिक अंतराचा नागरिकांकडून उडालेला फज्जा.
फोटो - ०८ नांदगाव लसीकरण
नांदगाव येथील जैन धर्मशाळेत लसीकरणासाठी झालेली गर्दी.
===Photopath===
080521\08nsk_23_08052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०८ नांदगाव लसीकरण नांदगाव येथील जैन धर्मशाळेत लसीकरणासाठी झालेली गर्दी.