नाशिक : शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.गेल्या काही दिवसांपासून पावसाची ओढ प्रत्येकाला लागली आहे. मेघ दाटून येत असले, तरी जोरदार सरींचे आगमन होत नसल्याने आता बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच वाढत्या आर्द्रतेमुळे वातावरणातील दमटपणा नागरिकांना घामाघूम करणारा ठरत आहे. येत्या २४ तारखेपर्यंत शहरात असेच ढगाळ हवामान कायम राहणार असले तरी पावसाची खूप काही जोरदार हजेरी नसेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोरदार पाऊस झाला असला तरी शहरात मात्र हलक्या सरींचा वर्षाव झाला. या वीस दिवसांत शहरात केवळ ६७ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडे आहे.यावर्षी निसर्गाकडून फारशी कृपादृष्टी होत नसल्याचे सर्वांचेच मत झाले आहे. जूनपासून अद्याप ४३१ मिमी इतका पाऊस पडला आहे.श्रावणसरींच्या वर्षावाकडे लक्षकाही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या पुनर्आगमनाकडे आता सगळ्यांचे डोळे लागले आहे. श्रावण मासात बरसणाऱ्या मध्यम व दमदार सरींच्या वर्षावाकडे बळीराजासह सर्वच नागरिक लक्ष ठेवून आहे. भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. तरीदेखील जोरदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.गेल्यावर्षी जून कोरडाठाक गेला होता; मात्र जुलैत पावसाने ती कसर भरून काढली होती. ६ जुलै २०१९ रोजी त्या २४ तासांच ७० मिमी इतका उच्चांकी त्या महिन्यातील पाऊस नोंदविला गेला होता. जुलैअखेर २९८.७८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गोदावरीही खळाळून वाहू लागल्याचे चित्र नाशिककरांनी बघितले होते. यंदा कोरोनामुळे वातावरणातील चैतन्य हरविले असताना दुसरीकडे पावसानेही दडी मारल्याने अधिक चिंता वाढली आहे.
पंधरवड्यापासून रुसला वरुणराजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 2:12 AM
शहरात गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये दमदार पाऊस निसर्ग चक्र ीवादळामुळे झाला; मात्र जुलैच्या पंधरवड्यापासून वरुणराजा रुसला असून, अद्याप शहरात केवळ या वीस दिवसांत ६७ मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी जुलैअखेर २९८ मिमी इतका पाऊस पडला होता. यंदा पुढील दहा दिवसांत या आकड्यापर्यंत पावसाची नोंद जाणे अशक्य असल्याची चिन्हे आहेत.
ठळक मुद्दे६७ मिमी पाऊस : गतवर्षी जुलैअखेर पडला २९८ मिमी पाऊस