दहीहंडी कार्यक्रमासोबत उत्कृष्ट राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापक उदय कुदळे व व्यवस्थापक सोमनाथ थेटे यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. बालगोपाळ व राधांनी घेर घालत मनोरा रचत दहीहंडी फोडत गोविंदा आला रे आला... गाण्यावर ठेका धरला व सारे वातावरण गोकुळमय करुन टाकले. सर्व विद्यार्थ्यांना लाह्या, दही साखरेचा प्रसाद वाटप करण्यात आला. तिसरीचे सर्व वर्गशिक्षक बापू चतूर, जीजा ताडगे, वृषाली जाधव, पद्मा गडाख यांनी दहीहंडी कार्यक्रमाचे व अमचल पवार व नीलेश मुळे यांनी उत्कृष्ट राधा कृष्ण स्पर्धेचे नियोजन केले. याप्रसंगी विनायक काकुळते, पाडूरंग लोहकरे, भास्कर गुरूळे, सागर भालेराव, सतिश बनसोडे, सुधाकर कोकाटे, मंदा नागरे, गणेश सुके, योगेश चव्हाणके, संदीप गडाख, रामेश्वर बलक, शिवाजी कांदळकर आदी उपस्थित होते.