सिन्नर : वारली चित्रकलेचे निर्मिते पद्श्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतीपित्यर्थ वंडर बुक व जिनियस बुक आॅफ रेकॉर्डसाठी घेण्यात आलेल्या नाशिक येथील आॅन दी स्पॉट चित्रकला स्पर्धेत येथील एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिकच्या ५० विद्यार्थ्यांनी सहभागी होत या वरील दोन्ही रेकॉर्ड बुक मध्ये नाव नोंदविणायाचा योग घडून आणला.मुख्याध्यापक उदय कुदळे व कला शिक्षक कल्याणी रहाणे यांच्या मार्गदर्शनातून या स्पर्धेत विद्यालयातील नंदिनी शरद खळकर या विद्यार्थीनीने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. सृष्टी गाडेकर व वेदांत गडाख यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सचिव राजेश गडाख यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक उदय कुदळे, व्यवस्थापक सोमनाथ थेटे, पंचाळे येथील महेश थोरात व शिक्षकवृंद उपस्थित होते.लायन्स क्लब, जैन सोशल गु्रप, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स व पंचवटी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वारली चित्रकलेसंदर्भात सर्वात जास्त १४५१ स्पर्धकांचा सहभागाबद्दल वंडर बुक आॅफ रेकॉर्ड व चित्रकलेतून सामाजिक संदेश दिल्याबद्दल जिनियस बुक आॅफ रेकॉर्ड असे दोन ठिकाणी नाव नोंद झाले.विद्यालयातील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक कल्याणी रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदवला. त्यांना वर्ग शिक्षक पद्मा गडाख, बापू चतुर, सुधाकर कोकाटे, पांडूरंग लोहकरे, सागर भालेराव, भास्कर गुरूळे, वृषाली जाधव, जीजा ताडगे, मंदा नागरे यांचे सहकार्य लाभले.
एस. जी. पब्लिक स्कूलची वंडर बुक मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 6:11 PM