नाशिक : राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे बेजार झाला असून जगण्यासाठी सघर्ष करीत आहे. मात्र महायुतीतील सत्ताधाऱ्यांमध्ये सत्ता संघर्षावरून चढाओढ सुरू असल्याची टिका करतानाच राज्यातील शेतकरी संकटात असल्यामुळे राज्यपालांनी बहूमताजवळ असलेल्या पक्षाला सत्तास्थापनेचे आदेश देणे अपेक्षित आहे. परंतु अशा स्थितीतही राज्यपाल सत्तास्थापनेबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे राज्यपाल कोणाच्या दबावाखाली कामकाज करीत आहेत काय असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश सचीव तथा प्रवक्ते सचीन सावंत यांनी उपस्थित केला आहे. नाशिक येथे काँग्रेस कमीटीच्या कार्यालयात गुरुवारी (दि.७) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचीन सावंत म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यांनी सत्ता स्थापन करणे गरजे आहे. परंतु, निवडणुकीचे निकाल येऊन १४ दिवस उलटूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. यांदर्भात राज्यपालही कोणतीही कारवाई करीत नसल्याने ही चिंताजनक बाब असल्याचे नूमद करतानाच राज्यपाल दबावत काम करीत असल्याची साशंकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच भाजप सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून बेरोजगारीत बेसुमार वाढ झाली आहे. मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मीतेचे आश्वासन दिले होते. परंतु आता भाजपचे नेते पकोडे तळणे,भीक मागणे हेही रोजगाराचे साधनच असल्याची विधाने करीत आहेत. देशात सर्व उद्योग धंदे संकटात असताना अमित शाह यांचे पूत्र जय शाह यांच्या संपत्तीत बेसूमार वाढ होत असून सत्तेच्या गैरवापर केल्यामुळे नेत्याच्या मुलांची संपत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचा आर्थिक विकास दर २०१४ पासून सातत्याने घसरत असून सरकारने गेल्या पाचवर्षात युवा वगार्चे भविष्य उध्वस्त करण्याचे काम केले आहे. या वर्षात हजारो कोटींचा अपहार झाला असताना त्यावर नियंत्रण नाहीतर अशाप्रकारांचे समर्थन केले जात आहे. आरबीआय सारख्या संस्थांची लूट सूरू असून आतापर्यंत साडेतीन लाख कोटी रुपये सरकाने घेतल्याचा अरोपही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान , भाजपाच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकाच्या धोरणा विरोधात आणि शेतकºयांच्या मागण्यांसाठी नाशिक जिल्हा व शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, हनिफ शेख आदि उपस्थित होते.
राज्यपाल दबावात काम करतात का - सचीन सावंत याचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 7:02 PM
राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यांनी सत्ता स्थापन करणे गरजे आहे. परंतु, निवडणुकीचे निकाल येऊन १४ दिवस उलटूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. यांदर्भात राज्यपालही कोणतीही कारवाई करीत नसल्याने ही चिंताजनक बाब असल्याचे नूमद करतानाच राज्यपाल दबावत काम करीत असल्याची साशंकता सचीन सावंत यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देराज्यपाल सत्तास्थापनेचे आदेश का देत नाही राज्यपालांवर कोणाचा दबाव सचीन सावंत यांनी उपस्थित सवाल