शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

...सद्बुद्धी दे बाप्पा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:13 AM

बाप्पा श्रीगणरायाचे आगमन म्हणजे मांगल्याची मुहूर्तमेढच असते. सारे अमंगल, विघ्न दूर करून बाप्पा आपल्यासाठी आनंद घेऊन येत असतात. बाप्पा हे बुद्धिदाता असल्याने चांगल्या कार्यासाठी सद्बुद्धी देण्याची प्रार्थनाही त्यांच्याकडे केली जात असते. आताही बाप्पा आलेले असल्याने महापालिका, जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणा असो की अन्य सरकारी आस्थापना, त्यातील भक्तांना लोकोपयोगी कार्यासाठी त्यांनी सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यासाठीच बाप्पांना हे पत्र...

साराश/ किरण  अग्रवालबाप्पा श्रीगणरायाचे आगमन म्हणजे मांगल्याची मुहूर्तमेढच असते. सारे अमंगल, विघ्न दूर करून बाप्पा आपल्यासाठी आनंद घेऊन येत असतात. बाप्पा हे बुद्धिदाता असल्याने चांगल्या कार्यासाठी सद्बुद्धी देण्याची प्रार्थनाही त्यांच्याकडे केली जात असते. आताही बाप्पा आलेले असल्याने महापालिका, जिल्हा परिषदेसारख्या यंत्रणा असो की अन्य सरकारी आस्थापना, त्यातील भक्तांना लोकोपयोगी कार्यासाठी त्यांनी सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना करण्यासाठीच बाप्पांना हे पत्र...प्रिय बाप्पा,यंदा १२ दिवसांसाठी आपण मुक्कामाला आला आहात, ही आमच्यासाठी आनंदाचीच बाब आहे. २०१० नंतर म्हणजे तब्बल ७ वर्षांनंतर असा हा दीर्घ सहवासाचा योग आला आहे. आपले येणे म्हणजे चैतन्याचे पर्वच असते. आपण विघ्नहर्ता तर आहातच, पण बुद्धीची देवताही आहात त्यामुळे आपल्या या मुक्काम काळात संकट निवारणाची नित्यनैमित्तिक कामना करणारे करतीलच, पण विविध माध्यमांतून सर्वसामान्यांसाठी सुखकर्ता ठरणे अपेक्षित असलेल्या यंत्रणा वा घटकांना सुबुद्धी देण्याचीही प्रार्थना आम्ही करू इच्छितो. आपापल्या बुद्धीने सर्व संबंधितांचे जे काही चालले आहे त्यात आणखी चांगल्याची भर पडावी, इतकेच यातून अपेक्षित आहे. शेवटी आम्हा साºयांची बुद्धी आमच्याच सुख-दु:खाच्या संबंधाने चालते. इतरांचा विचार करायची फारशी सवडच आम्हाला लाभत नाही. त्यामुळे समस्त जनांच्या आशा-आकांक्षा पूर्तीच्या दृष्टीने त्यात भर पडावी म्हणूनच मागणे असे की, आमच्यासकट साºयांना सद्बुद्धी दे बाप्पा !  वेळोवेळी आपली आराधना केल्यानंतर आपल्या आशीर्वादानेच गेल्यावेळी नाशिक महापालिकेत भाजपाला प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापन करायची संधी लाभली. अर्थात यासाठी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या सभेत नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करायची सुबुद्धी आपण आमच्या मुख्यमंत्र्यांना दिली, त्यामुळेच ते शक्य झाले याची आम्हास पुरेपूर जाण आहे. पण गेल्या सहा महिन्यांच्या कारभाराकडे बघता तेथे तितकेसे सुखकारक चालले आहे, असे म्हणता येऊ नये. विरोधकांनी किंवा बाहेरच्यांनी काही विघ्ने आणली म्हणावे तर तसेही नाही. पण स्वकीयांच्याच विघ्नांना निस्तारण्याची तेथे वेळ आली. महापौर, सभागृह नेते, गटनेते व स्थायी समितीचे सभापती अशा साºयाच पदांवर एकाच पक्षाचे ज्येष्ठ नेते विराजमान आहेत. परंतु, एकमताने कारभार हाकायच्या ऐवजी प्रत्येकाचे अजेंडे वेगवेगळे राहिल्याने परस्परात विसंवादच घडून येत असल्याचे दिसले. आपण जसे एकदंत तशी भाजपाही खरी एकचालकानुवर्तीच. केंद्रात व राज्यात त्याचे प्रत्यंतर येत आहेच. पण आमच्या महापालिकेत तसे होत नव्हते. महापौर एक म्हणत तर गटनेते दुसरेच. त्यामुळे अखेर पक्षनेत्यांना लक्ष घालून बाकीच्यांना दटवावे लागले. यापुढे जे काही चालेल ते महापौरांचेच, असे एकदाचे ठरले; पण होत नाही ना तसे. साधे सध्याच्या करवाढीचेच उदाहरण घ्या. प्रशासनाने सुचविलेली करवाढ स्थायी समितीने जशीच्या तशी स्वीकृत करून ठेवल्याने महापौरांना महासभेत तोंड देत देत मुश्कील झाले. अन्य कामांचे म्हणायचे तर सारी भिस्त खासगीकरणावर. प्रत्येकजण आपापला ‘मोदक’ पळविण्याच्या मागे लागलेला. त्यामुळे बुद्धीचा फारसा वापर न करता नवीन काही घडविण्याचे ध्यास बाळगले जात आहेत. त्यातून तोंडावर आपटायची नामुष्की ओढवते. एकच उदाहरण त्यासाठी देता येणारे आहे. दोन-दोन यांत्रिक झाडू भंगारात पडून असताना आमचे लोक औरंगाबादच्या ड वर्ग महापालिकेतील यांत्रिक झाडू बघायला जाऊन आलेत. शेवटी झाले काय? गुंडाळूनच ठेवावा लागला यासंबंधीचा निर्णय. असे विषय अनेक आहेत, की ज्यावरून गोंधळ उडताना दिसतो आहे. महापौरांना अवघा वर्षभराचाच कालावधी मिळणार आहे. त्यातील सहा महिने तर असेच निघून गेले. मग इच्छा असली तरी नाशिककरांना ‘अच्छे दिन’ दाखविणार कधी, अशी त्यांनाच चिंता आहे. तेव्हा आतापर्यंत जे झाले ते झाले. आता तुम्ही आलाच आहात ना, तर महापालिकेतील विसंवाद दूर सारून सत्ताधाºयांना ‘अच्छे दिन’ साकारण्यासाठी सद्बुद्धी दे बाप्पा ! जिल्हा परिषदेतही मोठ्या कालावधीनंतर यंदा शिवसेनेला अध्यक्षपद लाभले हीदेखील तुमचीच कृपा बाप्पा ! कारण आतापर्यंत भाजपाचा हात हातात घेऊनही अशी संधी मिळविता आली नव्हती. मागे एकदा सदस्यांची पळवापळवी करून पांडुरंग राऊत यांच्या निमित्ताने या संस्थेवर भगवा फडकवता आला होता, परंतु त्यानंतर ते जमले नव्हते. आता तुमचे नाव घेऊन स्वबळाचा श्रीगणेशा केला म्हटल्यावर नाही महापालिकेत तर, जिल्हा परिषदेत मात्र सत्ता मिळविता आली. तुम्हीच बुद्धी दिल्यानुसार काँग्रेसशी हातमिळवणी करून ही सत्ता खेचता आली याची जाणीव शिवसेनेला आहेच. पण सत्ता मिळाली तरी प्रभाव निर्माण करता येत नसल्याचे दुखणे आहे. ते आपण दूर करावे, अशी अपेक्षा आहे. या संस्थेत अध्यक्षपद शिवसेनेकडे व उपाध्यक्षपद काँग्रेसकडे असतानाच काही सभापतिपदे राष्ट्रवादी व भाजपाकडेही आहेत. त्यामुळे एकपक्षीय प्रभावच निर्माण करता येत नाही, अशी येथील अडचण आहे. आपल्याला लाभलेल्या पदाच्या अनुषंगाने सारेच पक्ष व त्यांचे नेते आपापली प्रतिष्ठापना करू पाहत आहेत. त्यामुळे धड कोणाचेच काम मार्गी लागताना दिसत नाही. त्यात राज्य शासनाने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीमुळे सुमारे ३० टक्के निधी कपात केला आहे. त्याचाही विकासकामांना फटका बसत असून, नवीन कामेच घेता येईनासे झाले आहे. एक साधे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रसिद्ध करण्याचे ठरविले तर किती अडचणी? कुठे शाळेच्या इमारती नाहीत तर कुठे विद्युत व्यवस्थाच नाही. जिथे विद्युत व्यवस्था आहे तिथे तुमचे वाहनाधिपती मूषकराव विजेची वायर कुरतडून नेतात. कसे साकारायचे डिजिटल शाळांचे स्वप्न? आरोग्यापासून बांधकामापर्यंत व महिला बालकल्याणापासून ते अन्य योजनांच्या अंमलबजावणीपर्यंत, सर्वत्रच अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढणे अवघड झाले आहे. म्हणूनच आमची विनंती आहे की, हा मार्ग काढून खºया अर्थाने ग्रामविकासाचे चित्र प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांना सद्बुद्धी दे बाप्पा! लोकप्रतिनिधींच्या बरोबरीने आमचे प्रशासनही चांगल्या कामासाठी तत्पर असते बाप्पा. पण त्यांनाही अनेक विघ्नांना सामोरे जावे लागते. अर्थात समृद्धी महामार्गाच्या संदर्भाने उद्भवलेली विघ्ने अखेर तुम्हीच वाढीव मोबदला देण्याची सद्बुद्धी दिल्याने दूर होऊ लागली आहेत हेही खरे, पण आता अन्यही जे प्रकल्पग्रस्त यादृष्टीने आस बाळगून आहेत, त्यांचेही जरा कल्याणाचे बघा ना बाप्पा! भावली, भाम, कश्यपीसारख्या प्रकल्पग्रस्तांपासून ते रस्ते आदी कामांसाठी आपल्या जमिनी देऊन भूमिहीन झालेल्यांच्या पुनर्वसनाचे, नोकरीचे तसेच भूसंपादनाच्या रखडलेल्या मोबदल्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यासंदर्भाने आतापर्यंत वेळोवेळी न्यायालयात धाव घेण्याची वेळ संबंधितांवर आली आहे. त्यातूनच जिल्हाधिकाºयांची खुर्ची जप्त करण्यात आल्याची नामुष्कीही ओढवून झाली आहे. तेव्हा समृद्धी महामार्गासाठी उदार होत ज्या पद्धतीने वाढीव मोबदला देण्याची बुद्धी शासनकर्त्यांना दिली, तशी अन्य प्रकल्पग्रस्तांच्याही बाबतीत निर्णय होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे नाशकातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढताना दिसत आहे. यावर्षात आतापर्यंत तब्बल २७ खून पडले असून, यात गुन्हेगारी टोळ्यातील वैमनस्यही पुढे आले आहे. एकीकडे विविध समाजउपयोगी उपक्रमांद्वारे पोलीस जनतेचे मित्र ठरत असल्याचे दिसून येत असताना दुसरीकडे गुन्हेगारीकरण वाढत आहे. तेव्हा याबाबतीत प्रश्नांच्या निराकरणाची व पोलिसांना कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याची सद्बुद्धी दे बाप्पा!  यंदा आपल्या कृपेने आमच्याकडे पाऊसही चांगला झाला आहे. राज्यातील मराठवाडा व अन्य क्षेत्रात बिकट परिस्थिती उद्भवली असताना आमच्यावर मात्र आपण कृपा केली आहे बाप्पा! त्याबद्दल आम्ही पामरांनी आपले आभार तरी कसे मानावेत? शेवटी कर्ते, करविते आपणच आहात. त्यामुळे यंदाच्या आपल्या उत्सवात नियम निकषाच्या पातळीवर यंत्रणांनी कितीही अडचणी उभ्या केल्या तरी त्यांना पुरे पडून आम्ही आपले स्वागत जल्लोषातच केले आहे. आपल्याला जास्तीच्या मोदकांचा प्रसादही अर्पण करणार आहोत आम्ही. पण आमचेही कान कुणी ओढल्याखेरीज आम्हाला काही गोष्टी कळत नाही, हे तर आपण जाणतातच ना बाप्पा! तेव्हा पाऊस पाण्याच्या बाबतीत आपण कृपा केली असली तरी हे पाणी अडविण्याची व जमिनीत जिरविण्याची सुबुद्धी आपण देण्याचीही अपेक्षा आहे बाप्पा! कारण गेल्यावेळी जलशिवार योजनेत जिल्ह्यातील २१८ गावांमध्ये सुमारे २०० कोटींचा खर्च करून विविध कामे केली गेली आहेत. यातील अनेक बंधाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे तर काही कामे व्यर्थ ठरल्याचेही आढळून आले आहे. पण जे झाले ते झाले. कोळसा उगाळून फायदा होणार नाही, हे आम्हासही ज्ञात आहे. तेव्हा जलसाठा भरपूर आहे म्हणून कसाही वारेमापपणे पाण्याचा वापर न करता ते जपून वापरण्याची गरज आहे. तेव्हा त्याबद्दलची मानसिकता जागविणारी सद्बुद्धी दे बाप्पा!