शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

साधुग्राम, रामकुंड वाहनांना बंद

By admin | Published: August 05, 2015 12:03 AM

उपाययोजना : वाहतूक कोंडीसह पोलिसांचे सुरक्षिततेचे कारण

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राम, रामकुंड या परिसरात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतुकीची कोंडी व सुरक्षिततेच्या कारणास्तव नाशिक पोलिसांनी या भागातील वाहतूक मार्गात मोठे बदल केले असून, त्याची मंगळवारपासून अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र जे मार्ग पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केले त्या मार्गावरील वाहनधारकांनी नेमके काय करावे याचा विचारच पोलिसांनी केलेला नाही. पोलिसांनी केलेला हा बदल ४ आॅगस्टपासून तब्बल ४८ दिवसांपर्यंत म्हणजे २० सप्टेंबरपर्यंत कायम राहणार असून, साधुग्राममधील ध्वजारोहण, प्रथम, द्वितीय व तृतीय शाहीस्रानानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी वाहनांसाठी बंद केलेले रस्ते पुन्हा खुले केले जाणार आहेत.या बंदीतून मात्र पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाची वाहने व साधू-महंतांची वाहने वगळण्यात आली आहेत़ (प्रतिनिधी)भाविकांसाठीची पार्किंग४साधुग्रामला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग, स्वामिनारायण पोलीस चौकी ते मीनाताई ठाकरे स्टेडियम सर्व्हिस रोड व स्टेडियम लगतचा पाटाचा रस्ता, नाशिक तट डावा कालवा (मिर्ची हॉटेल) ते विडी कामगारनगर चौफुलीकडे जाणाऱ्या रोडवरील दोन्ही बाजूकडील एक-एक लेन, मारुती वेफर्स ते जयशंकर गार्डनकडील रोडच्या दोन्ही बाजूकडील एक-एक लेनची जागा पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे़