शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साधुग्राममध्ये शुकशुकाट

By admin | Published: September 26, 2015 10:44 PM

मंडपांची आवरासावर : कपिला संगमावर भाविकांचा ओघ

नाशिक : साधुग्राममधील कपिला संगम वगळता सर्वत्र खालशांनी बस्तान गुंडाळल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे. ‘राम’नामाच्या गजराने गजबजणारे तपोवन शांत झाले आहे.सेक्टर एक, दोनमधील सर्वच खालशांनी साहित्य आवरल्याने भाविकांची गजबज असणारे साधुग्राम ओस पडले आहे. मंडपाची आवरसावर करणाऱ्या कामगारांशिवाय दुसरे काही नजरेस सध्या पडत नाही. मंडपाचे साहित्य भरण्याचे काम कामगार करीत आहेत. खालशांतील साधू-महंतांचे भक्तगणही रवाना झाले आहेत. त्यामुळे भाविकांनी आता साधुग्रामकडे पाठ फिरवली आहे. साडेतीनशे हेक्टरमध्ये प्रशासनाने तपोवनात साधू-महंतांना सुविधा उपलब्ध केली होती. मात्र साधू-महंत, भक्तगण साहित्य घेऊन रवाना झाल्याने शौचालय व स्नानगृहाच्या पत्रे नजरेस पडत आहेत. परराज्यातून कपिला संगमावर दाखल होणारे भाविक आवर्जून साधुग्राममध्ये फेरफटका मारतात. त्यामुळे या भाविकांना खालशांच्या जागेवर कचऱ्याचे दर्शन होते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. कपिला संगमावर लक्ष्मण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक कुतूहलाने रामसृष्टीत जातात. मात्र सेक्टर दोनमधील रामसृष्टीत सफाई न झाल्याने कचरा साचला आहे. (प्रतिनिधी)