त्र्यंबकेश्वर : येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदीर कोरोना कोव्हीडच्या पाशर््वभूमीवर गेल्या साथ मिहन्यां पासुन बंद अवस्थेत आहेत. हे मंदिर उघडण्यासाठी त्र्यंबकेश्वर भाजप व साधु संत महंतां तर्फे काल लाक्षणकि उपोषण आंदोलन करण्यात आले.गेल्या आठ मिहन्यांपासुनबंद असलेल्या राज्यातील मंदिरांचे दरवाजे उघडावेत याकरीता भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने अनेक वेळा मागणी करण्यात आली. या निर्णया विरोधात महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, विविध संप्रदायाचे साधुसंत, असे धार्मिक अध्यात्मिक , व व्यावसायिक संघटना यांनी एकत्र येत आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पदाधिकारी समन्वया तुन मंगळवार दि.13 रोजी लाक्षणकि उपोषणाची हाक देण्यात आली होती.श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे सर्व अर्थचक्र येणारे भाविक, यात्रेकरू यांचेवर पुर्णपणे अवलंबुन आहे. गेल्या साडे सहा मिहन्यांपासुन मंदिर व पुजाविधी बंद असल्याने गावाचे अर्थकारण डबघाईला आले आहे. त्यानुसार आज भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरा समोर विविध आखाडयांचे साधु महंत, पुरोहित, मंदिरावर अवलंबुन असलेले फुल विक्र ेते, हॉटेल- लॉज चालक, प्रसाद विक्र ेते, इतर दुकानदार, रिक्षा टॅक्सी युनियन, युनियन तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लाक्षणकि उपोषण केले. मंदिर बंद, उघडले बार, उध्दवा धुंद तुझे सरकार अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या व अशा मजकुराचे फलक देखील लावण्यात आले होते. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी त्र्यंबकेश्वर येथील षड्दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती तथा भगवान बाबा जुना आखाडाचे महंत विष्णुगिरी महाराज यांनी आखाडा परिषदेच्या वतीने आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा दिला .भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव, जिल्हा चिटणीस तृप्ती धारणे, जिल्हा नेते अॅड. श्रीकांत गायधनी, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष रविंद्र गांगुली, यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे व शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणकि उपोषण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, जिल्हा सदस्य कमलेश जोशी, शाम गंगापुत्र, उपनगराध्यक्ष माधवी भुजंग, ओ.बी.सी. व माळी समाजाचे अध्यक्ष प्रविण पाटील, तालुका सरचिटणीस हर्षल भालेराव, सचिन शुक्ल, जयराम भुसारे, बाळासाहेब अडसरे,अनघा फडके, मिलिंद धारणे, पुरोहित संघ अध्यक्ष प्रशांत गायधनी, मनोज थेटे, बाळासाहेब चांदवडकर, जयंत शिखरे, नाभिक समाज अध्यक्ष गणेश मोरे, टॅक्सी युनियन अध्यक्ष भारत कर्पे, ग्राहक मंच अध्यक्ष नरेंद्र पेंडोळे, रविंद्र (बाळा) सोनवणे, पंकज धारणे, रामचंद्र गुंड, युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे,भाऊसाहेब झोंबाड, संजय कुलकर्णी, विजय शिखरे, समीर दिघे, पंकज भुजंग, रविंद्र गमे, राजू शर्मा, मयूर वाडेकर, तेजस ढेरगे, लोकेश अकोलकर, योगेश गंगापुत्र, रमेश दोंदे, नगरसेवक समीर पाटणकर, सागर उजे, सायली शिखरे, शीतल उगले, संगीता मुळे, आरती शिंदे, वैष्णवी वाडेकर, मंजुषा चांदवडकर, सुवर्णा वाडेकर, भावेश शिखरे, मयूर वाडेकर, संजय कुलकर्णी, चंद्रकांत प्रभुणे, गोकुळ गारे, राहुल वाव्हळ, यशवंत भोये, प्रशांत बागडे, पियुष देवकुटे, संकेत टोके, श्रीराज कान्नव, तन्मय वाडेकर, विजय पुराणकि, राकेश रहाणे, सुयोग शिखरे, गिरीश जोशी, उमेश शिखरे, ओंकार नाकील, निषाद चांदवडकर, किरण चौधरी, अमति बागडे आदी उपास्थित होते.आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.