नाशिक : महापौरांनी केलेल्या घोषणेनुसार नगरसेवकांना प्रभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यास आयुक्तांनी स्पीलओव्हर कमी करून देण्याच्या अटी-शर्तीवर मान्यता दिल्यानंतर आतापावेतो ४४ सदस्यांनी निधी खर्च करण्यासाठी लेखा विभागाला प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामध्ये सेना-भाजपाचेच सदस्य आघाडीवर असून, निधीसाठी महासभांमध्ये सत्ताधारी भाजपाला चुचकारणाºया विरोधी पक्षात विशेषत: राष्टÑवादी व मनसेच्या एकाही सदस्याने प्रस्ताव दाखल केलेला नाही. आतापर्यंत ९ कोटी ३३ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव आले आहेत. सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ४० लाख रुपये नगरसेवक निधीची शिफारस केलेली होती. त्यात महापौर रंजना भानसी यांनी ३५ लाखांची भर घालत निधी ७५ लाखांवर नेला होता. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी केवळ ४० लाख रुपयांचाच नगरसेवक निधी देण्याविषयी तयारी दर्शविली होती. त्यावर, महापौरांसह पदाधिकाºयांनी आयुक्तांची भेट घेऊन ७५ लाखांचाच निधी देण्याचा आग्रह कायम ठेवला. त्यावेळी, आयुक्तांनी वाढता स्पीलओव्हर सुमारे २०० कोटी रुपयांनी कमी करून दिल्यासच ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून देता येईल, अशी भूमिका घेतली. अखेर, सत्ताधारी भाजपाने मागील पंचवार्षिक काळातील प्रशासकीय मान्यता नसलेल्या सुमारे २०२ कोटी रुपयांच्या कामांना कात्री लावली. त्यानंतर, आयुक्तांनी ७५ लाखांच्या निधीला मान्यता दर्शविली. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून लेखा विभागाकडे विविध विकासकामांसंबंधीचे प्रस्ताव सदस्यांकडून दाखल केले जात आहेत. आतापावेतो, ४४ नगरसेवकांनी आपले प्रस्ताव दाखल केले असून, त्यात भाजपाच्या २५, सेनेच्या १४, कॉँग्रेसच्या ३, रिपाइं व अपक्षांचा प्रत्येकी एक सदस्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ७५ लाखांच्या घोषणेचे पुढे काय झाले, अशी वारंवार विचारणा महासभेत करणाºया विरोधकांमध्ये प्रस्ताव दाखल करण्याबाबत उदासीनता आहे. राष्टÑवादी कॉँग्रेस व मनसेच्या एकाही सदस्याने अद्याप प्रस्ताव दाखल केलेला नाही.जाधव-नागरेंची शिल्लक ४ हजारप्रत्येक नगरसेवकाला चालू आर्थिक वर्षात ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि तो वर्षभरात खर्च करायचा आहे. अनेक नगरसेवकांनी ४० ते ६० टक्के निधी खर्च करण्याचे प्रस्ताव लेखा विभागाला दिले आहेत. परंतु, प्रभाग १० मधील भाजपाचे नगरसेवक शशिकांत जाधव आणि सुदाम नागरे यांनी पहिल्याच फटक्यात प्रत्येकी ७४ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे प्रस्ताव लेखा विभागाला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावे शिल्लक अवघे ४ हजार रुपये उरले आहे.मूलभूत सुविधांसाठी प्रस्तावप्रस्ताव दाखल करण्यात ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक सर्वात पुढे आहेत. नवखे नगरसेवक अजूनही चाचपडत आहेत. विशेष म्हणजे नगरसेवकांकडून समाजमंदिर, व्यायामशाळा याऐवजी पाणीपुरवठा, ड्रेनेज, पथदीप या मूलभूत सुविधांसाठी प्रस्ताव सादर केले जात असल्याने त्याचे स्वागत केले जात आहे.विरोधीपक्षनेता पिछाडीवरसभागृहात विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते तसेच राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी ७५ लाखांच्या निधीचे काय झाले म्हणून सत्ताधारी भाजपाला चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी, महापौरांनी निधीची तरतूद होईल, अशी ग्वाही दिली होती.आता, सेनेचे गटनेता निधी खर्च करण्यात पुढे असताना विरोधीपक्षनेत्यांचा मात्र अद्याप प्रभागातील कामांसाठी एकही प्रस्ताव आलेला नाही आणि राष्टÑवादीचे गजानन शेलारही त्यात पिछाडीवर आहेत.कॉँग्रेसच्या सहापैकी हेमलता पाटील, समीर कांबळे, राहुल दिवे, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आणि अपक्ष मुशीर सय्यद यांचेच प्रस्ताव आले आहेत.
सेना-भाजपा सदस्य आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:48 AM