या दोघांना सुवर्णपदक, मानाचा पट्टा, ट्रॉफी, अकरा हजार रुपयांचे बक्षीस देऊन जयदेव वावरे, राजेंद्र सातपूरकर, प्रवीण बंदावणे, भाऊदास सोनवणे, मयूर देवरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत सर्वच शरीरसौष्ठवपटूंनी त्यांचे कौशल्य पणाला लावले. स्पर्धेतील बेस्ट पोझरचा मान क्लासिक फिटनेसच्या सोनू पवारने मिळवला. त्यानंतर चौथ्या मेन्स फिजीकचा किताब नाशिकरोडच्या विशाल कोटकरने मिळवला. त्यात दुसरा क्रमांक महादेव गायकवाड, तृतीय क्रमांक कृष्णा पिंगळे, चतुर्थ भूषण हिरे, तर पाचवा क्रमांक ऋषीकेश जाधव यांनी चमकदार कामगिरी बजावली. तर फिजीकली चॅलेंज नाशिक श्री स्पर्धेत मालेगावच्या अरबाज शेख याने बाजी मारली. त्यात व्दितीय क्रमांकावर सद्दाम हुसेन तर तृतीय स्थान हर्षल सूर्यवंशी याने पटकावले.
फोटो
‘नाशिक श्री-२०२१’ विजेत्यांसमवेत जयदेव वावरे, राजेंद्र सातपूरकर, प्रवीण बंदावणे, भाऊदास सोनवणे, मयूर देवरे आदी.