जापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक व पालक यांची सविचार सभा नुकतीच संपन्न झाली. राजापूर येथील शाळा सुरू करण्या बाबत सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शाळा सूरु करण्यासाठी शासनामार्फत जेव्हा माहिती प्राप्त होईल तेव्हा शाळा सूरु करण्याचा निर्णय घेतला जाईल . परंतू ग्रामस्थांची व पालकांची मागणी असल्याने मोठे वर्ग सुरू केले जातील. कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन शाळेचे प्राचार्य व्हि. के. अलगट यांनी केले आहे.शासनाच्या नियमानुसार जेथे गाव कोरोना मुक्त आहे. त्या ठिकाणच्या शाळा भरणार आहे. राजापूर माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत वर्ग सुरू होणार आहे. परंतू सध्य परिस्थितीनुसार पालकांनी दहावी व बारावी हे दोन वर्ग सुरू करण्यात यावे अशी मागणी पालकांनी केली आहे.विद्यार्थ्यांसाठी शाळेत येताना मास्क व सॅनीटायझरचा वापर केला जाणार आहे. शाळा सूरु करण्याच्या पुर्वी शाळा जंतुनाशक फवारणी करण्यात येऊन मगच वर्ग भरावेत असे राजापूर ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक यांनी सुचना मांडली.यावेळी संस्थेचे संचालक तुळशीराम विंचू, विजय सानप, उपसरपंच सुभाष वाघ, शिक्षक पालक संघांचे लक्ष्मण घुगे, अनिल अलगट, दत्ता सानप, शंकर अलगट, समाधान चव्हाण, संतोष भाबड, अरुण भोरकडे, धनराज अलगट, पी. के. आव्हाड, भारत वाघ, सुरेश आगवण, शरद आगवण, तलाठी डी. एस. रोहकले, राजापूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल ठेगील, नाना कापडणे त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राजापूर विद्यालयात सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:59 PM
जापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक व पालक यांची सविचार सभा नुकतीच संपन्न झाली. राजापूर येथील शाळा सुरू करण्या बाबत सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे शासनामार्फत जेव्हा माहिती प्राप्त होईल तेव्हा शाळा सूरु करण्याचा निर्णय