नाशिक : साहित्यविश्व संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या सह्याद्री पुरस्कार-२०१९ चा वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात अवयवदान या विषयावर जनजागृती व क्रांती करणाºया स्वराज फाउंडेशनला सह्याद्री पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, प्रसिद्ध कवी संतोष वाटपाडे, विनोद बोधले, ऋषिकेश पानगे हे उपस्थित होते.सोहळ्यात विविध क्षेत्रांत काम उत्कृष्ट काम करणाºया मान्यवरांना सह्याद्री गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये स्वराज फाउंडेशनचे संस्थापक अॅड. आकाश छाजेड, योगीता खांडेकर, अभिषेक छाजेड, अश्विन गटने, ममता छाजेड, पल्लवी रकिबे, डॉ. अनुपमा मराठे, माधुरी मालपाणी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी छाजेड यांनी आपल्या मनोगतात, आगामी काळात अवयवदान जनजागृती महाराष्ट्र नव्हे तर देशभरात करून जागतिक विक्र म करणार असल्याचे सांगितले. साहित्यविश्व संमेलनाच्या दिवशी अनेक विषयांवर चर्चासत्र, काव्यवाचन, कविता वाचन, व विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन शहरामध्ये करण्यात आलेले होते. प्रास्ताविक विनोद बोधले यांनी केले. सोनाली मराठे यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थांचा परिचय करून दिला.याशिवाय विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी केल्याबद्दल आम्रपाली चव्हाण, प्राजक्ता ओक, पीनल वानखेडे, अश्विनी देशमाने यांनाही सह्याद्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी कार्यक्र मात गझल गायक सुरेश वैराळकर यांचा ‘गझल रंग’ हा कार्यक्र म सादर झाला व या कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्कृष्ट दाद दिली.
सह्याद्री पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:00 AM