नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील साई पालखी मित्र मंडळाच्या वतीने आयोजीत साई भंडारा कार्यक्रम शनिवारी (दि.१३) साईंची भव्य मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे या साई पालखी भंडारा कार्यक्रमाच्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या अश्वांनी सुंदर असे नृत्य सादर करत भाविकांना मोहित केले.कार्यक्रमाची सुरूवात साईबाबांच्या मिरवणूकीने करण्यात आली. नांदूरवैद्य येथील साईभक्तांनी सकाळपासूनच सुंदर फुलांनी रथ सजवलेला होता. गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर सडा-रांगोळी केली होती. त्यानंतर ५ वाजता साईबाबांची मुर्ती ठेवलेल्या व सजवलेल्या रथातुन पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान महिलांनी औक्षण करत दर्शनासाठी गर्दी केली होती. मिरवणूक हळूहळू पुढे सरकत असतांना मारूती मंदिराजवळ आल्यानंतर या ठिकाणी अश्वांच्या नृत्यविष्काराच्या जुगलबंदीचा कार्यक्रम पार पडला. या मध्ये पारंपरिक गीतांच्या चालीवर या अश्वांनी सुंदर असे नृत्य सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली.त्यानंतर मिरवणूक भैरवनाथ महाराज या मुख्य मंदिराजवळ आल्यानंतर साईबाबांची सामुहिक आरती करण्यात आली. यावेळी साईबाबा पालखीसाठी ज्या मान्यवरांनी योगदान दिले होते, त्यांचा नांदूरवैद्य येथील साई पालखी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर महाप्रसादाचे वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी दिपक जोशी, सुधाकर बोराडे, ज्ञानेश्वर काजळे, बॅकेचे व्यवस्थापक लक्ष्मण मुसळे, गणेश मुसळे, नवनाथ कर्पे, सुनिल मुसळे, रवि काजळे, जनार्दन यंदे, विजय भोर, अंकुश काजळे, सुभाष मुसळे, शिवाजी काजळे, नवनाथ शेलार, संदिप पवार, कविता वायकोळे, कविता जोशी, दिपाली मुसळे, रुपाली यंदे आदींसह साई पालखीतील भाविक सहभागी झाले होते. (१४
साई भंडारा कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 6:30 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील साई पालखी मित्र मंडळाच्या वतीने आयोजीत साई भंडारा कार्यक्रम शनिवारी (दि.१३) साईंची भव्य मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे या साई पालखी भंडारा कार्यक्रमाच्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या अश्वांनी सुंदर असे नृत्य सादर करत भाविकांना मोहित केले.
ठळक मुद्देनांदूरवैद्य : अश्वांच्या नृत्यविष्काराने भाविक मोहित