येवला : शहरातील बुंदेलपुरा येथे साईबाबांच्या जीवन लिलावर आधारित पाच दिवसीय संगीतमय साई चरित्र कथा सोहळा संपन्न झाला. साईबाबा महासमाधी शतक महोत्सवानिमित्ताने बुंदेलपुरा येथे परदेशी प्रतिष्ठानच्यावतीने साई चरित्र कथा सोहळा पाच दिवसीय संगीतमय कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. यावेळी साई कथाकार म्हणून बीड येथील श्रीसाई गोपाल देशमुख यांनी सर्व साईबाबांच्या चरित्राचे निरु पण केले. रोज संध्याकाळी पाच दिवस साई कथा ऐकण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. यावेळी दररोज साईबाबांच्या विविध लिलांवर आधारित सजीव देखावे सादर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे साई चरित्र कथा सोहळ्याच्या समाप्तीच्या दिवशी शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीमध्ये ढोल, झांज याचे प्रात्यिक्षक दाखवण्यात आले. तसेच यावेळी भव्य रथ सजवून साईबाबांची मूर्तीची मिरवणूक बुंदेलपुरा, राणा प्रताप पुतळा, मेन रोड, थिएटर रोड, आझाद चौक या मार्गे काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीमध्ये सर्व महिलांनी फेटे परिधान करून सहभागी झाल्या होत्या. तसेच कथा सांगता प्रसंगी साईबाबांची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दिनेश परदेशी, निरंजन परदेशी, बंटी परदेशी, धीरज परदेशी, अशोक गुजर, श्रीकांत खंदारे, विशाल सगम, आकाश परदेशी, मनोज रसाळ, मयूर कायस्थ, अक्षय शिंत्रे, यांच्यासह परदेशी प्रतिष्ठान, बुंदेलपुरा तालीम संघ, जय शंभोनारायण प्रतिष्ठान, मुंबादेवी, संत रोहिदास मित्र मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ, टक्कर गणेश मंडळ ,करणी सेनाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
येवल्यातील बुंदेलपुरा येथे साई चरित्र कथा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 2:31 PM