फोटो फाईल नेम : ०८ एमडीईसी ०८ . जेपीजी
फोटो कॅप्शन : साई एकता हॉकर्स युनियनतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना सुधाकर जोशी, दिनेश ठाकरे आदी.
प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शविण्यात आला असून, केंद्र शासनाने कृषी व कामगारविरोधी कायदा रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. निवेदनावर मयूर वांद्रे, गंगा गायकवाड, राजू पाटील, राजू ठाकूर, शाम कर्पे आदींच्या सह्या आहेत.
पदवीधर संघटना
मालेगावी पदवीधर संघटनेतर्फे शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने शेतकरीहिताचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर अध्यक्ष जीवन हिरे, समीर अहिरे, सुमीत पगारे, दिनेश पवार, किशोर प्रजापत, आकाश पाटील, महेश खैरनार, तेजस भावसार आदींच्या सह्या आहेत.
फोटो फाईल नेम : ०८ एमडीईसी ०९ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी पदवीधर संघटनेतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जीवन हिरे, समीर अहिरे, सुमीत पगारे, आकाश पाटील आदी.
काटवन परिसरात बंद
वडनेर : शेतकऱ्यांच्या भारत बंदला मालेगाव तालुक्यातील काटवन परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळपासून वडनेर बाजारपेठेत बहुसंख्य दुकाने खुली होती. काल मंगळवारचा आठवडा बाजार असल्याने व्यापाऱ्यांची लगबग सुरू होती.
फोटो फाईल नेम : ०८ एमडीईसी १० . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यात वडनेर येथे बाजारानिमित्त झालेली गर्दी.