नांदूरवैद्य: साई फ्रेंड सर्कल मिञमंडळाच्या आठव्या वंजारवाडी ते शिर्डी साईबाबा पालखी पदयाञेस प्रारंभ झाला.यानिमित्त सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे यावर्षी या पालखी पदयाञेत महिलांनी सर्वाधिक सहभाग नोंदवला असून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावर्षी या पदयाञेत जवळपास १०० महिलांनी आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत साई पालखी पदयाञेचा आनंद घेतला.त्याचप्रमाणे साधारणत: दिडशे ते दोनशे साईभक्त सहभागी झाले असले तरी ही संख्या तिनशेपर्यंत गेलेली असेल असे साई समितीच्यावतीने सांगण्यात आले. मिरवणूकीदरम्यान साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले.त्यानंतर मारूती मंदिरापासून साई पालखी मिरवणूकीला ढोल ताशांच्या गजरात सुरूवात करण्यात आली.या मिरवणूकीमध्ये सुंदर अशा सजवलेल्या पालखीत ठेवलेली साईबाबांची प्रतिमा भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. यानंतर साई पदयाञेत सहभागी झालेल्या भाविकांना निरोप देण्यासाठी परिसरातून तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यानंतर ओम साईराम, साईबाबा की जय च्या गजरात पालखीचे पुढील मार्गाकडे प्रस्थान करण्यात आले. याप्रसंगी साई समितीचे योगेश शिंदे, गुणवंत शिंदे, भिमराव शिंदे, पंडीत शिंदे, मनिषा कातोरे, सविता दळवी, निशा काळे, मुक्ताबाई शिंदे, अलका शिंदे, खंडू शिंदे, अर्जुन सामोरे, शरद कातोरे, किसन लोहरे, प्रकाश परदेशी, भास्कर शिंदे, बहिरु शिंदे, आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
साईबाबा पालखीचे शिर्डीकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 2:11 PM