कोरोनाची महामारी गावात नाही तर वाडी वस्तीवरच्या घरा- घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपल्याने मृत्यूचे भय जणू गावात तांडव करत आहे.
वर्षभरात शासन आदेशानुसार स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सायगाव ग्रामपंचायतीने वेळोवेळी बैठका घेऊन ठोस उपाययोजना केल्या. दोन वेळेस कोरोना लसीकरण शिबिर राबविण्यात आले. घरोघरी जाऊन लक्षणे बाधित रुग्णांची तपासणी करण्यात आली. मात्र वाढते कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण बघता दि. ३ मे रोजी ग्रामपंचायतीने सात दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. मेडिकल व दूध संकलन केंद्र वगळता सात दिवस गाव बंदचा आदेश जारी करण्यात आला आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बैठकीस सरपंच अनिता खैरनार, अशोक कुळधर, गणपत खैरनार, रंजना पठारे, संदीप पुंड, दीपक खैरनार, भाऊसाहेब आहिरे, योगिता निघुट, अरविंद उशीर, दिनेश खैरनार, शरद लोहकरे, संतोष दौंडे, उल्हास उशीर, ग्रामसेवक प्रदीप बोडखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.