पंचवटी : रामकुंड येथील वतनदार नाभिक संघटनेच्या वतीने संतश्रेष्ठ सेना महाराज यांची जयंती शुक्र वारी (दि.३१) शहर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वैशाख वद्य द्वादशी हा दिवस सेना महाराज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. सकाळी रामकुंडावरील वतनदार नाभिक संघटनेच्या संत सेना मंदिरात श्रींच्या मूर्तीस जलाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रामसेतू पुलाजवळ सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी नाभिक समाज युवक मंडळाचे दिलीप जाधव, अखिल भारतीय नाभिक महामंडळाचे नारायण यादव, सुभाष बीडवई, हरिश सोनवणे, सुरेश सूर्यवंशी, विजय पंडित, अशोक वाघ, केतन मगर, संतोष रायकर, ज्ञानेश्वर बोराडे, भास्कर शेजवळ, कैलास वाघ, संतोष वाघ, अशोक निकम, अनंत सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्र मात जाधव यांनी श्री संतसेना महाराज यांच्या जीवनावर माहिती विशद केली.
संत सेना महाराज जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:29 AM