शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

शिवसंपर्काची आरंभशूरता न ठरो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:43 AM

शिवसैनिकांचा सवाल : पहिलाच दिवस सुनासुना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्लंबर शोधण्याची गरज पडणार नाही, फोन केल्यास तो घरापर्यंत पोहोचेल. कार्यालय हायटेक होईल, एका क्लिकसरशी सेनेचा इतिहास, पदाधिकारी, सैनिकांची माहिती डोळ्यासमोर उभी राहील, प्रत्येक विभागात संपर्क कार्यालयाची निर्मिती करून विभाग पातळीवरच जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल अशा एक नव्हे तर जवळपास डझनभर राजकीय थाटात घोषणा केल्यानंतर त्याचा सोयीस्कर विसर पाडून घेतलेल्या शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान राबविण्याचा सोडलेला संकल्प पहिल्याच दिवशी बारगळला. मुंबईत शिवसैनिकांमध्ये लोकोपयोगी उपक्रमांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याची चढाओढ लागलेली असताना नाशकात मात्र वाढदिवसाच्या निमित्ताने गटबाजीचेच प्रदर्शन दिसून आले. शिवसेनेचा कोणताही कार्यक्रम वा उपक्रम असो तो यशस्वी करण्यासाठी सैनिकांमध्ये जो सळसळता उत्साह असतो त्याला अन्य राजकीय पक्षात तोड नाही. मातोश्रीने आदेश दिला तर तो शिरसावंद्य मानून पूर्ण करण्यासाठी स्वत:ला झोकून देण्याची सैनिकाची ही वास्तवता कोणताही राजकीय पक्ष नाकारत नसला तरी, एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यात ही वास्तवता लोप पावते की काय, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होय. यापूर्वी शिवसेनेचा स्थापना दिवस असो वा पक्षप्रमुखांचा वाढदिवस, शिवसैनिकांकडून विभागनिहाय व शाखानिहाय लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत होते, दिवसभर अशा कार्यक्रमांमध्ये पक्षाचे पदाधिकाऱ्यांनाही मिरविले जात होते; मात्र यंदा पहिल्यांदाच शहर व जिल्हा शिवसेनेत कार्यक्रमांचा अभाव दिसला, तो दिसेल याची जाणीव अगोदरच झाली की काय म्हणून पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाच्या छायाचित्रांतून गटबाजीचे प्रदर्शनपक्षप्रमुख ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर, जिल्ह्यात करण्यात आलेल्या होर्डिंग्ज व जाहिरातींमधून प्रत्येकाने ठाकरे यांना आपल्या वैयक्तिक शुभेच्छा देताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्रे हेतुपुरस्सर टाळले आहेत. काही ठिकाणी जिल्हा व महानगरप्रमुखांचे छायाचित्रेच नसल्याने एकप्रकारे त्यांचे नेतृत्वच अमान्य केल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचे दिसल्याने पक्षातील गटबाजी अद्यापही कायम असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.