याबाबतीत राष्ट्रवादी पक्षाचे नाशिक तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे व कार्यकर्त्यांनी भुजबळ यांना साकडे घालत एकलहरेच्या ६६० मेगावॅट प्रकल्पाबाबत इत्थंभूत माहिती दिली. सध्या सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प महानिर्मिती कंपनीच्या माथी मारून एकलहरेचा प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकलहरेचा प्रकल्प राज्य शासन अंगीकृत असल्याने आधी तो सुरू करावा, अशी विनंती एकलहरेच्या शिष्टमंडळाने केली. त्यावर याआधी ऊर्जामंत्र्यांसोबत एक बैठक झाली असून, एकलहरेच्या प्रकल्पाची वीज महाग पडते, असे सांगण्यात आले. मात्र, येथील वीज दराबाबत पुन्हा एकदा तज्ज्ञांंसोबत चर्चा करून ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेऊ, तेव्हा एकलहरेच्या शिष्टमंडळालाही विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, प्रकल्प बचाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सागर जाधव, रामदास पाटील, आसाराम शिंदे, शानू निकम, उमेश जाधव, बंटी पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो- एकलहरे येथील ६६० मेगावॅट वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, आसाराम शिंदे, रामदास पाटील, शानू निकम आदी.
(फोटो २६ एकलहरे)