बागलाण तालुक्यात रोजगारनिर्मिती करण्यासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करणे ही काळाची गरज असून, येथील शेकडो बेरोजगार युवकांची खूप वर्षांपासूनची आग्रही मागणी आहे. त्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वैभव गांगुर्डे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून उद्योगमंत्री सुभाष देसाई व उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक येथील प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या सूचनेनुसार मुख्य सर्वेक्षण अधिकारी राजाराम बहिरम यांनी सर्वेक्षण करून त्यात अजमेर सौंदाणे व ठेंगोडा येथील व तालुक्यातील इतर गावांतील सरकारी जमिनीची पाहणी केली. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात स्थळ पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करावी यासाठी उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रांतिक सदस्य वैभव गांगुर्डे, अजमेर सौंदाण्याचे सरपंच धनंजय पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे आदी उपस्थित होते.
इन्फो
चोहोबाजूने अनुकूलता
बागलाण हा कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण व नावीन्यपूर्ण प्रयोग करून राज्यात नावाजलेला तालुका आहे. येथे कांदा, डाळिंब, द्राक्षे, मका, भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याच आधारावर तालुक्यात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून सुरू केले तर उद्योग व रोजगारवाढीला चालना मिळणार आहे. तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील हजारो विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहेत. सटाणा शहरापासून मुंबई, पुणे, नाशिक, सुरत या मोठ्या औद्योगिक वसाहती अगदी काही तासांच्या अंतरावर असून, या ठिकाणी लागणारा पूरक व कच्चा माल तयार करून पाच ते सहा तासांत पोहोच करू शकतो, तसेच मालाची ने-आण करण्यासाठी शहरापासून दळणवळणाची साधने त्यात रेल्वे स्टेशन, विमानतळ, तर पाण्यासाठी धरणे ही ठराविक अंतरावर उपलब्ध आहेत.
फोटो- २८ सटाणा तटकरे
राज्याच्या उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देताना नगराध्यक्ष सुनील मोरे. समवेत वैभव गांगुर्डे, धनंजय पवार, दत्तू बैताडे आदी.
280721\28nsk_11_28072021_13.jpg
फोटो- २८ सटाणा तटकरे राज्याच्या उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देताना नगराध्यक्ष सुनील मोरे. समवेत वैभव गांगुर्डे, धनंजय पवार, दत्तू बैताडे आदी.