औंदाणे : नाशिक जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठी साकडे घातले.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मुख्याध्यापक पदोन्नती अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा प्रश्न निकाली निघणार असल्याचे डॉ. झनकर यांनी सांगितले. विनंती बदली करण्याबाबत संघाचे पदाधिकारी यांनी विस्थापित झालेले पती-पत्नी तसेच शिक्षक यांच्यासाठी तरी किमान विनंती बदल्या कराव्यात. बहुतांश शिक्षक बांधवांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत असून, त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिष्टमंडळाने डॉ. झनकर यांच्याकडे केली. तूर्त सगळ्या बदल्या रद्द झाल्या असल्याने, शिवाय बदलीप्रक्रिया राबविताना दहा तारखेच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार नसल्याने वेळेअभावी विनंती बदल्या करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यालय दाखला सक्ती न करण्याबाबत अध्यक्ष यांनी कोविडचे गांभीर्य ओळखून, हा विषय राज्यस्तरावर घेतलेला असल्याने तूर्त दाखले घेण्यात येऊ नये, असे सांगितले आहे. संगणक वसुली थांबविण्याबाबत जिल्ह्यात काही ठिकाणी संगणक वसुली सुरू असल्याचे दिसून येत आहे, मात्र राज्य शासनाच्या दि.२० नोव्हेंबर २०१८ च्या पत्रानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदप्रमाणे आपणही वसुली थांबवावी, ही मागणी शिक्षणाधिकारी यांनी मान्य केली आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष आर. के. खैरनार, विनायक ठोंबरे, अर्जुन ताकाटे, बाजीराव सोनवणे, प्रदीप पेखळे, देवीदास पवार, विश्वास भवर, आप्पा खैरनार, आबा पवार, विनोद गायकवाड, धनराज भामरे, शरद बरमे, कांतीलाल सोनवणे, मधुकर दोबाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक संघाचे विविध मागण्यांसाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 4:39 PM
औंदाणे : नाशिक जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून विविध मागण्यांसाठी साकडे घातले.
ठळक मुद्देसंगणक वसुली थांबविण्याबाबत जिल्ह्यात काही ठिकाणी संगणक वसुली सुरू असल्याचे दिसून येत आहे,