नाशिक : हॉटेलमध्ये अवैधरीत्या अफू व अंमली पदार्थ विक्र ीसाठी ठेवणाऱ्या देवळा येथील हॉटेल व्यावसायिक जोगिंदरसिंग ऊर्फ जोखिया रघुवीर चौहान यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. ए. दौलताबादकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली़ देवळा तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर साईप्रसाद नावाचे हॉटेल असून, तेथे अफू व तत्सम अंमली पदार्थांची विक्र ी होत असल्याची गुप्त माहिती देवळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २० जानेवारी २०१३ रोजी हॉटेलवर छापा टाकण्यात आला़ त्यावेळी हॉटेलमालक चौहानकडे ७७८ ग्रॅम अफू तसेच घरझडतीमध्ये २१ किलो अफूची पावडर असा पाच लाख सहा हजार १६० रु पयांचा माल सापडला होता़ या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्याचे हवालदार विलास शिवाजी वाघ यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती़ हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. ए. दौलताबादकर यांच्या न्यायालयात सुरू होता़ सरकारी वकील कल्पेश निंबाळकर यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानुसार हॉटेलमालक चौहानवर आरोप सिद्ध झाले व त्यास पाच वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)
अंमली पदार्थ विकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकास सक्तमजुरी
By admin | Published: December 06, 2014 1:28 AM