नाशिक : महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून सर्वज्ञात असलेल्या ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सखी मंच सदस्यता नोंदणीस उदंड प्रतिसाद लाभत आहे. २०२० या वर्षासाठीची सदस्यता घेतलेल्यांना यंदा पुन्हा सदस्य होण्याची आवश्यकता नसून त्यांचे सदस्यत्व यंदाही कायम केले जाणार आहे. मात्र, नवीन सदस्यांनी लवकरात लवकर लोकमतच्या नाशिक शहर, नाशिकरोड किंवा अंबड कार्यालयात जाऊन नोंदणी करावी.
लोकमत सखी मंचच्यावतीने वर्षभर विविध प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजन, व्यक्तिमत्व विकास,सदाबहार गाणी, सिनेतारकांच्या भेटी, मस्ती,धूम नृत्याचे अनेकोनेक कार्यक्रम सादर केले जातात. तसेच अनेक प्रकारचे अभिनव उपक्रम करुन महिलांच्या कलागुणांना, आनंदाला वाव मिळवून दिला जातो. त्यामुळे या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी सखी मंच सदस्यत्वाची नोंदणी आवश्यक असते. यंदाच्या सखी मंच सदस्यता नोंदणीसाठी केवळ ५०० रुपये शुल्क आकारले जाणार असून त्यात ८०० रुपयांचा सिध्विक बाथरुम ४ पीस सेट आणि सखी मंच सिक्रेट रेसिपीज बुक मोफत मिळणार आहे. तसेच सहभागी होणाऱ्या सखींना डायमंड धमाका योजनेंतर्गत हिऱ्याचे दागिने , तसेच टकले ज्युएलर्सचे १०० रुपयांच्या नथचे, करिश्मा फॅशन ॲक्सेसरीजचे १०० रुपयांचे मंगळसूत्र सेट, सोनी डिझायनर स्टुडिओचे १०० रुपयांचे डिझायनर आकर्षक ब्लाऊज पीसच्या कुपनची भेट देण्यात येणार आहे. सखी मंच सदस्यत्व नोंदणीसाठी लोकमतचे शरणपूर रोड कार्यालय, दत्तमंदिर बस स्टॉपवरील नाशिकरोड कार्यालय किंवा लोकमत भवन, बी-३, एमआयडीसी अंबड येथील कार्यालयात येऊन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या वेळेत नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांना ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
इन्फो
गतवर्षीचे सदस्यत्व कायम
गतवर्षी कोरोनामुळे मार्चनंतर उपक्रम होऊ न शकल्यामुळे २०२० या मागच्या वर्षी ज्या सखींनी सदस्यत्व घेतले होते, त्यांना पुन्हा सदस्यत्व घेण्याची आवश्यकता नसून त्यांचे सदस्यत्व यंदादेखील कायम केले जाणार आहे. मात्र, नवीन सदस्यत्वासाठी त्वरित नोंदणी आवश्यक असून कार्यालयात येऊन अर्ज भरुन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोगो
लोकमत सखी मंचचा लोगो वापरणे.