नांदगाव ते साकोरा या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत नवीन रस्त्याचे काम चालू असल्याने संबंधीत ठेकेदाराने पर्यायी कुठलाही नवीन रस्ता उपलब्ध करून न दिल्याने परिसरातील तब्बल वीस ते बावीस गावांतील वाहनचालकांना खड्डेमय , प्रचंड धुळीच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.तसेच पुढे याच रस्त्यावर शिवमळा ते साकोरा रस्त्यांवरील मोरखडी मातीनाला बंधारा यावर्षी शंभर टक्के पाण्याने भरल्याने त्याचे पाणी गेल्या चारमहिन्यांपासून या रस्त्यावर वाहत असल्यामुळेखड्डे पडले आहेत. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.नांदगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने साकोरा रस्त्यावरून कळमदरी,मंगळणे,काकळणे, वेहळगांव,सावरगाव,पळाशी,पांझण,जामदरी, तळवाडे,सायगांव,पिलखोड,गिरणाडॅम,आमोदे,बोराळे, अशा तब्बल वीस ते बावीस गावांतील वाहनचालकांना याच रस्त्यावरून मोठी कसरत करून नांदगाव येथे यावे लागते.दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावर असेच पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत होती.त्या अनुषंगाने संबंधित विभागाने या ठिकाणी दोन जागेवर मोरी टाकून तसेच सुरूंग लावून पाणी मोकळे वाहून रस्त्यावर भर टाकून रस्ता उंच करणेकामी लाखो रूपये कागदोपत्री खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे.सुरूवातीला रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूने मोठी चारी करून पाण्याला मोकळी वाट करून दिली असती तर आज अशी दुरवस्था झाली नसती असे अनेक नागरिक बोलून दाखवत आहे.संबधीत दोन्ही विभागाच्याअधिकाऱ्यांनी येवून पाहणी करून या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.साकोरा ते नांदगाव या तीन कि.मी.च्या अंतरात खड्डे पडले असून, पाण्याच्या खड्ड्यातून तसेच धुळीत प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे अनेकांना डोळ्यांचे तसेच मनक्याचे आजार जडले आहेत.संबंधित विभागाने त्वरीत या रस्त्याची दुरु स्ती करावी.-योगेश पाटील रहिवासी.या रस्त्यावर आमचे रोजचेच जाणे-येणे चालू असल्याने वाहनांचाआणि वाहनचालकांंनापाठदुखीचा आजार झाला आहे.त्यामुळे बाहेरगावी दुध घेऊन जाणे अवघङझालेआहे.म्हणजे नुकसान करवून घेणे झाले आहे.-दत्तू शेवाळे , रहिवासी.(08साकोरारस्ता)
साकोरा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 4:43 PM
साकोरा-नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत धुळीचे साम्राज्य तर पुढे रस्ताच जलमय झाला असल्याने खड्ड्यांमधून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
ठळक मुद्दे धुळीचे साम्राज्य : वाहनधारकांमध्ये संतापाची लाट.