नांदगाव : जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकांमधील रंगत सुरू झाली असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेल्या साकोरा गटात अद्यापही उमेदवारीवरून मारामाऱ्या सुरू आहेत. येथे राष्ट्रवादीचे दिग्गज, त्यांची तिकिटे नक्की होत नाहीयेत. न्यायडोंगरी गटात अहेरांचेच एकमेकांना आव्हान आहे. एकंदरीत भाजपाला उमेदवार गवसत नाही. काँग्रेस व राष्ट््रवादी प्रत्येकी दोन गटात अजमावत आहेत. पक्षपातळीवर स्वतंत्र लढती दिसून येत असल्या व प्रत्येक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला असला तरी नामनिर्देशन दाखल करताना काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपा यांची छुपी युती होणार का, हा प्रश्न असून, तो राजकीय वर्तुळात फिरत आहे.उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार अद्याप निश्चित होत नसल्याने व भाजपाचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवाराच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र जणू एका पडद्याआडच्या तडजोडीकडे अंगुलीनिर्देश करणारे असल्याने अनेक तर्कवितर्कांचा राजकीय जन्म होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आघाडी घेतली असून, त्यांचे चार गट व आठ गणांसाठी १२ उमेदवार सज्ज झाले आहेत.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत गट व गण वाटपात नव्याने निर्माण झालेला जातेगाव व साकोरा हे दोन्ही गट राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आहेत तर न्यायडोंगरी व भालूर गट काँग्रेसकडे आहेत. वरवर हे वाटप समसमान धोरणाचा पुरस्कार करणारे वाटत असले तरी त्यात मेख दडलेली आहे. भालूर गट माजी आमदार संजय पवार व राजेंद्र पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. ते एकत्र आहेत तर माजी आमदार अनिल अहेरांच्या राजकारणाचे मूळ न्यायडोंगरी गट व गावात आहे. यावरच तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. भालूर व न्यायडोंगरी गटातले अनु. काँग्रेस व भाजपाचे उमेदवार म्हणूनच कळीचे ठरतात.
साकोरा गटात संभ्रम कायम
By admin | Published: February 04, 2017 12:58 AM