साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी अलका कृष्णा कदम यांची आवर्तननुसार झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली.एकूण सतरा सदस्यांपैकी महिला सदस्यांचे संख्याबळ नऊ असून, सरपंचपद सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने सरपंच महिलाच आहेत. विद्यमान सरपंच अनिता सोनवणे यांनी आवर्तननुसार पदाचा राजीनामा दिला होता.यावेळी एकूण सतरा सदस्यांपैकी अवघे नऊ सदस्य या निवडीसाठी उपस्थित होते. अनिता सोनवणे, उपसरपंच संदीप बोरसे, दादा बोरसे, ज्ञानेश्वर मोरे, सतीश बोरसे, आशा बोरसे, संजय सुरसे, अलका कदम, ऊर्मिला निकम आदी सदस्य उपस्थित होते. सदर ग्रामपंचायतीचा कार्यकाल ८ आॅगस्ट २०२० रोजी संपत असल्याने अजून दीड वर्ष बाकी आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वेहळगाव बिटचे मंडळ अधिकारी बी.ए. पैठणकर, ग्रामविकास अधिकारी बी. बी. सरोदे, तलाठी कपिल मुत्तेपवार उपस्थित होते.
साकोरा सरपंचपदी अलका कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 5:03 PM
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी अलका कृष्णा कदम यांची आवर्तननुसार झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली.
ठळक मुद्देअलका कदम यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे सरपंच म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली.