नाशिक : महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसाला सेवेत घेतल्यानंतर तीन वर्षे ३२०० रुपयांच्या फिक्स पेवर काम करावे लागते. मात्र आता प्रशासनाने ही पद्धत बंद केली असून, नव्याने रुजू होणाऱ्यांनादेखील वेतनश्रेणीच लागू केली जाणार आहे. त्यामुळे नव्याने रुजू होणाºया कामगारांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.महापालिकेत सफाई कामगारांची १५५० पदे आहेत. लाड आणि पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने सफाई कामगारांची रिक्तपदे भरली जातात. मात्र असे करताना नवनियुक्त कामगाराला ३२०० रुपये इतकेच वेतन दिले जाते.अन्य कामगारांप्रमाणेच सफाईची सर्व कामे जबाबदारीने पार पाडणाºया कामगारांना अशाप्रकारे वेतन देताना भेदाभेद करण्याचा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तीन वर्षे फिक्स पेवर काम करणाºया कामगारांचा आडावा घेऊन, मग त्यांना सेवेत कायम मरून पूर्ण वेतनश्रेणी देण्यात येते.मात्र महापालिकेने आता त्यात बदल केला असून, वारसा हक्काने निवड झालेल्या कामगारांनादेखील अन्य कामगारांप्रमाणेच रुजू होताना दिली जाणारी ५२०० ही वेतनश्रेणी देण्यात येणार आहे, असे महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त महेश बच्छाव यांनी या संदर्भात सांगितले.तीन वर्षे ‘फिक्स पे’वर काम करणाºया कामगाराला नंतर वेतनश्रेणी देण्याची पद्धत असली तरी त्यात बदल केल्यानंतर वेतनश्रेणी लागू करताना परिवीक्षाधीन कालावधीचे पत्र दिले जाईल म्हणजेच प्रोबेशनरी म्हणून नियुक्तपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर सेवेत कायम केले जाणार आहे. त्यामुळे या कामगारांचा प्रश्न सुटणार आहे.
सफाई कामगारांना ‘फिक्स पे’ ऐवजी वेतनश्रेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:17 AM