नाशिक : ‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र शाखेच्या उपाध्यक्षपदी नाशिकचे प्रवीण पगार, तर मानद सचिवपदी प्रदीप काळे निवडून आले आहेत.
‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ अर्थात आयआयए ही भारतातील समस्त वास्तुविशारद व्यावसायिकांची शीर्ष संस्था आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या या संस्थेला १०३ वर्षांचा इतिहास आहे. वीस हजारपेक्षा जास्त सभासद असलेल्या या संस्थेच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका ई-वोटिंगव्दारे घेण्यात आल्या. त्यात आर्किटेक्ट प्रवीण पगार व प्रदीप काळे यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली.
नाशिक शाखेसाठी झालेल्या निवडणुकीत रसिक बोथरा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी समीर कुलकर्णी, मानद खजिनदारपदी स्मिता कासार-पाटील, मानद सचिवपदी रोहन जाधव यांची निवड करण्यात आली आहे तर अमोल चौधरी, अंकित मोहबन्सी, रोहिणी मराठे, कौशल कटाळे व सतीश पवार यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे.