देवळा : केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार बाजार समितीत विक्रसाठी आणलेल्या सर्वच शेतमाल विक्रची रक्कम दि.१ सप्टेंबर २०१९ पासून आता शेतकरी वर्गाला रोख देण्याऐवजी आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीद्वारे बँक खात्यावर जमा होणार असल्याने शेतकरी वर्गाने स्वागत केले आहे. परंतु व्यापा-यांनी चोवीस तासांच्या आत शेतमाल विक्रि चे पैसे शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची मागणी होत आहे.शेतमाल विक्र ीचे सर्व पैसे थेट बँक खात्यात वर्ग होणार असल्याने शेतकरी वर्गात चर्चा सुरू असली तरी शेतक-यांना बाजार समितीत शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाचे भाडे, अथवा स्वत:चे वाहन असल्यास त्यासाठी लागणा-या इंधनाचा खर्च करण्यासाठी पैसे कुठून उपलब्ध होणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. याशिवाय व्यापारी वर्गाने वेळेवर बँकेत पैसे जमा न केल्यास पुन्हा चौकशीसाठी व्यापा-यांकडे हेलपाटे मारण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे त्यात बाजार समितीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मजूरी, वाहन भाडे आदी देण्यासाठी किमान काही रक्कम रोख स्वरूपात मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.बॅँकांविषयी भितीशहरातील राष्ट्रीयकृत बँकाविषयी शेतकरी ग्राहकांच्या वाढत्या तक्र ारी पाहता बँकेत थेट शेतमालविक्र ीची रक्कम जमा झाल्यानंतर काही बॅँका शेतक-यांची अडवणूक करू शकतात. परस्पर कर्ज खात्यात पैसे वर्ग करण्याचे प्रकार यापूर्वी काही बँकांनी केले आहेत. तसे झाले तर केंद्र सरकारच्या नवीन धोरणाचा लाभ न होता शेतकरी आर्थिक संकटात सापडतील, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
शेतमाल विक्रीचे पैसे आता थेट बॅँक खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 6:31 PM
शेतकऱ्यांकडून स्वागत : मात्र व्यापाऱ्यांबाबत संशयाचे मळभ
ठळक मुद्देमजूरी, वाहन भाडे आदी देण्यासाठी किमान काही रक्कम रोख स्वरूपात मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत