पाथरी : मागील काही महिन्यांपासून शहरात बंद असलेला गुटखा विक्री व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. पोलिस ठाण्यासमोरच गुटखा विक्री केंद्र असल्याने या प्रकाराला पोलिसांची मदत आहे की काय? अशी शंकाही व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. गुटखा विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असतानाही प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पाथरी शहर हे अवैध गुटखा विक्रीचे जिल्ह्याचे मुख्य केंद्र बनले आहे. पाथरी शहरातून जिल्ह्यातील इतर तालुक्यासमवेत जिल्ह्याबाहेरही अवैधरित्या गुटखा विक्री केली जाते. मागील काही महिन्यांपासून गुटखा विक्री बंद झाली होती. परंतु आता गुटखा विक्रीच्या व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरामध्ये खुलेआम गुटख्याची विक्री होत असताना स्थानिक पोलिस प्रशासन, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि संबंधित खात्याकडून या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे. गुटखा विक्री करणारे एक रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटच्या माध्यमातूूनच शहरातील विविध दुकाने आणि पानटपऱ्यांवर गुटख्यांच्या पुड्या सर्रास पोहोचविण्यात येतात. यामध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढालही होते. (वार्ताहर)गुटखा विक्रीला पोलिसांचे अभयगतवर्षी पाथरीत अवैध मार्गाने येणारा गुटख्याचा टेम्पो पोलिसांनी रंगेहाथ पकडला होता. १३ लाख रुपयांचा गुटखा पोलिस ठाण्यामध्ये जप्तही करण्यात आला. परंतु त्याची कुठे विल्हेवाट लावण्यात आली याबाबत मात्र नागरिकांना माहिती नाही. शासनाकडून गुटखा विक्री बंद असल्याने अवैध मार्गाने शहरात होणाऱ्या गुटखा विक्रीला पाथरी पोलिसांचे अभय असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गुटखा विक्री व्यवहारामध्ये अवैैध गुटखा विक्री चालक आणि पोलिसांमध्ये दरमहा मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचीही चर्चा आहे.
पोलिस ठाण्यासमोर गुटख्याची विक्री
By admin | Published: June 15, 2014 12:20 AM