शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पंचवटीत गुटख्याची विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:14 PM

अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देअन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक/पंचवटी : गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गुटखाविक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केवळ धातूरमातूर कारवाई केली जाते. पंचवटी विभागातील पानटपरी, चहाटपरी ते किराणा दुकान एवढेच नव्हे तर हॉटेलांमध्येही गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जाते. एकीकडे शासनाकडून गुटख्यावर बंदी असल्याचे सांगून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे पान दुकानदार तसेच अन्य दुकानात उघडपणे गुटख्याची विक्री केली जाते. नाशिक शहरात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात आहे. अनेकदा याबाबत पोलिसांनाही माहिती मिळते; मात्र त्यांच्याकडूनही कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.पंचवटी विभागात गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुटखा जप्तीची कारवाई केली गेली व या कारवाईत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचा गुटखा पकडला गेला; परंतु याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टोक्ती न केल्याने गुटखा नेमका पकडला कोणी व कारवाई केली कोणी हे गुलदस्त्यातच आहे; मात्र पोलिसांच्या पथकाने गुटखा पकडल्याची चर्चा पोलीस कर्मचाºयांत उघडपणे सुरू आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य