किशोर इंदोरकर,
मालेगाव कॅम्प : मालेगावकरांचे चित्रपटप्रेम नवीन नाही. या ठिकाणी दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला अक्षरश: गर्दी उसळते. परंतु काही उत्साही प्रेक्षकांमुळे मालेगावचे नाव बदनाम होऊ पाहत आहे. शनिवारी (दि.२७) सुभाष चित्रपटगृहात सलमान खानच्या ह्यअंतिमह्ण या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काही उत्साही टोळक्याने फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. याप्रकरणी पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल केला. परंतु या फटाकेबाजीची खुद्द सलमान खाननेदेखील गंभीर दखल घेतली असून, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मालेगावातील या घटनेचा व्हिडीओ टाकून मालेगावचे नाव न घेता अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करत उत्साही प्रेक्षकांचे कान टोचले आहे. असे धोकादायक प्रकार सार्वजनिक ठिकाणी न करण्याचे आवाहनदेखील सलमान खानने केले आहे.सिनेमाचा मालेगावी मोठा इतिहास आहे. आवडत्या हिरोच्या ह्यएंट्रीह्णला प्रेक्षकांचा अतिउत्साह सिनेमागृह व इतर प्रेक्षकांना धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या अतिउत्साही सिनेप्रेमींना वेसण घालण्याची मागणी शहरातून होत आहे. शुक्रवारी यंत्रमाग व इतर उद्योग बंद असतात. त्यामुळे या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या नवीन चित्रपटांना गर्दी होते. शनिवारी सुभाष या सिनेमागृहात सलमान खानच्या एन्ट्रीला अतिउत्साही सिनेप्रेमींनी अक्षरशः सिनेमागृहात फटाके फोडत रॉकेट उडवले. यामुळे सिनेमागृहात एकच गोंधळ उडाला व अन्य प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण होऊन पळापळ सूरू झाली.
या घटनेची माहिती कानोकानी, सोशल मीडियावर सर्वत्र पसरली. घटनेची माहिती सोशल मीडियामुळे चित्रपटाचा नायक सलमान खान यांना मिळाली. सलमान खानने याची गंभीर दखल घेत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मालेगावातील या घटनेचा व्हिडीओ टाकून अशा प्रकारच्या घटनांचा निषेध केला व असे धोकादायक प्रकार सार्वजनिक ठिकाणी न करण्याचे आवाहन केले. सलमान खानसह पिंकव्हिला, फिल्म फेअर, बॉम्बे टाइम या सोशल मीडिया हँडलवर मालेगावातील घटनेचा व्हिडीओ टाकून असे प्रकार न करण्याचे आवाहन केले गेले. मालेगावी आवडत्या नायकांचे फँन क्लब नाही तरीही काही नायकांचे समूह गट तयार झाले असल्याची माहिती आहे. हे गट आवडत्या नायकांचे चित्रपट पाहताना असा आततायीपणा करतात. यामुळे इतर प्रेक्षक वेठीस धरले जात असल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.अतिउत्साहीपणामुळे चिंता वाढल्यायापूर्वी मालेगावी असे प्रकार होत नव्हते असे नाही. पूर्वी सिनेमागृहात आवडत्या नायकाची एण्ट्री झाल्यावर पैशांची चिल्लर, नाणेफेक होत होती, तर काही महाभाग आवारातील कॅन्टीनमधून कपबश्या चोरून खिशात आणत व त्या अतिउत्साहीपणे पदड्यावर फेकत असत. यामुळे एकच गोंधळ उडायचा. प्रसंगी हाणामारीचे प्रकार सिनेमागृहात होत असत. आता चिल्लर पैसे, कपबश्या फेकणे हे प्रकार बंद झाले असले तरीही फटाके फोडणे हा प्रकार वाढला असल्याने चित्रपटगृह मालक व प्रेक्षकांची चिंता वाढली आहे.शासनाने दिलेल्या नियमानुसार चित्रपटगृह सुरू केले आहेत तर नवीन प्रदर्शित व आवडत्या नायकांचे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होते आहे. आम्ही सर्व प्रेक्षकांची तपासणी करून प्रवेश देत आहोत. तरीही काही वेळा गर्दीमुळे फटाके व इतर वस्तू नकळतपणे चित्रपटगृहात आणले जातात. यापुढे आम्ही अजून चांगल्या पद्धतीने तपासणी करून प्रेक्षक आत सोडू. यासाठी अतिरिक्त कर्मचारी व पोलिसांची मदत घेऊ.- सूभाष सूर्यवंशी, संचालक, सुभाष चित्रपटगृह, मालेगावमालेगावातील सर्व चित्रपटगृहांना शासनाने दिलेल्या नियमानुसार चित्रपटगृह सुरू करण्याबाबतीत नोटीस बजावली आहे. त्यांनी जमल्यास जास्त कर्मचारी व इतर सुरक्षाव्यवस्था ठेवली पाहिजे. जेणेकरून फटाके फोडण्याचे प्रकार व इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. पोलीस प्रशासनदेखील यासाठी सहकार्य करीत आहे.- एस. पी. गायकवाड, पोलीस निरीक्षक, छावणी पोलीस ठाणे, मालेगाव