शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला ‘गुगल’चा सलाम!

By admin | Published: January 04, 2017 12:05 AM

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला ‘गुगल’चा सलाम!

नाशिक : भारताच्या पहिल्या महिला मुख्याध्यापक, ज्येष्ठ समाजसुधारक व महिला कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या १८६व्या जयंतीनिमित्त जागतिक स्तरावरील ‘गुगल’ या सर्च इंजिनने सावित्रीबाई फुले यांचे आकर्षक ‘डुडल’ साकारून त्यांना अभिवादन केले.महिलांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी (दि.३) सर्वत्र साजरी करण्यात आली. सावित्रीबाई यांचा जन्म राज्यातील सातारा जिल्ह्यामधील नायगावमध्ये १८३१ साली झाला होता. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी इंग्रज राजवटीमध्ये लढा देत स्त्रियांना न्याय मिळवून दिला. १८४८ सालात त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली. यावेळी फातिमा शेख या एकमेव महिलेने शिक्षकाची जबाबदारी स्वीकारून सावित्रीबाई यांना मोलाची साथ दिली होती. महिलांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी सावित्रीबार्इंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून तब्बल १७ शाळा उघडल्या. सतीप्रथा, बालविवाह, विधवाविवाह निषेध अशा अन्यायकारक रुढींविरुद्ध एल्गार पुकारत महिलांना त्यामधून मुक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामधील अभूतपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ राज्य सरकारने पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण केले. या प्रमुख माहितीसह सावित्रीबाई यांच्या संपूर्ण जीवनकार्यावरही ‘गुगल’ने प्रकाश टाकला आहे. ‘डुडल’वर क्लिक करताच सावित्रीबाई यांच्या कार्याची माहिती जगभर ‘गुगल’वरून उपलब्ध होत होती.