शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

फुले सेवा मंडळातर्फे गुणवंतांना समाजभूषण पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 10:59 PM

सटाणा : येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंच व महात्मा फुले सेवा मंडळ यांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला मंचच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देसटाणा : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, बक्षीस वितरण

सटाणा : येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंच व महात्मा फुले सेवा मंडळ यांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला मंचच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. महात्मा फुले पतसंस्थेचे संचालक हेमंत मोरे व सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष संगीता मोरे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने क्रांतिज्योती महिला मंच सटाणा यांच्या वतीने कोविड काळात उल्लेखनीय काम करणारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत अहिरराव,तर सटाणा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या वर्षा जाधव, शिक्षण क्षेत्रात डॉ. दौलतराव गांगुर्डे व सोपान खैरनार, साहित्ययान संस्थेचे सचिव सोमदत्त मुंजवाडकर, रोटरीचे माजी अध्यक्ष प्रदीप बच्छाव, योगेश अहिरे, देवमामलेदार ट्रस्टचे संचालक सुनील खैरनार, सुरेश खैरनार, कोविड लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवत असल्याबद्दल रेखा वाघ व क्रीडा शिक्षक गणेश वाघ, सिंधू वाघ,सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र या संस्थेच्या नाशिक जिल्हाअध्यक्ष संगीता हेमंत मोरे या सर्व मान्यवरांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष भारत खैरनार,सेवा मंडळ अध्यक्ष मांगू खैरनार, सचिव सुनील खैरनार ,खजिनदार झिपरू खैरनार,माजी नगरसेवक दोधा मोरे,भगवान गांगुर्डे, यशवंत कात्रे, तुकाराम खैरनार,मनीष ढोले,दादाजी खैरनार, मनोज वाघ, प्रकाश अहिरे, सुरेखा मोरे, सुशीला अहीरे, सुनीता शिंदे, दीपाली जाधव ,विजया मोरे , तुळसाबाई शेवाळे, सुनीता खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते. आयोजन क्रांतिज्योती महिला मंचच्या अध्यक्ष संगीता मोरे, जिजाताई मोरे, शोभाताई वाघ, अरुणा खैरनार, भारती शेलार, रेखा वाघ, कुंदा खैरनार, लक्ष्मी अहिरे, मीनाक्षी अहिरे, सुनीता जाधव, योगिता मोरे यांच्यासह महिला मंचने केले होते. सूत्रसंचालन लक्ष्मी अहिरे व प्रियांका खैरनार यांनी केले तर वैभव गांगुर्डे यांनी आभार मानले. 

टॅग्स :talukaतालुकाSocialसामाजिक