नाशिक : मिस्त्र कालगणनेनुसार दाऊदी बोहरा मुस्लीमांनी गुरूवारी (दि.१४) शहरात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदच्या सामुहिक नमाजपठणाचा सोहळा कुतुबी मशिदीत पार पडला.रमजान ईद हा इस्लामी संस्कृतीचा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. दाऊदी बोहरा बांधवांकडून अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद साजरी करण्यात आली. धार्मिक पारंपरिक पध्दतीनुसार या समाजाची दिनदर्शिका मिस्त्र कालगणनेवर आधारलेली आहे. त्यामुळे या समाजाचे सण उत्सव चंद्रदर्शनावर अवलंबून नसते. अमावस्येनंतर पुढील महिना मोजला जात असल्यामुळे दोन दिवस अगोदर या समाजाची ईद साजरी झाली. दरम्यान, सकाळी कुतुबी मशिदीमध्ये शहराचे बोहरा समाजाचे अमीलसाहेब अलहद युसुफभाईसहाब, अलहद मुस्तली भाईसाहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नमाजपठण करण्यात आले. नमाजपठणानंतर उपस्थित बोहरा बांधवांनी त्यांनी मार्गदर्शन केले. मशिदीसह शहरात चार मुख्य केेंद्रांवर नमाजपठणाची व्यवस्था बोहरा जमातच्या वतीने करण्यात आली होती. नमाजपठण पार पडताच उपस्थितांनी एकमेकांना अलिंगण देत शुभेच्छा दिल्या. तसेच बहुतांश समाजबांधवांनी मुंबई गाठून धर्माचे मुख्य धर्मगुरू डॉ. सय्यदना अलीकादर मुफद्दल सैफुद्दीनसाहेबांसोबत ईद साजरी केल्याची माहिती स्थानिक जमातच्या वतीने देण्यात आली. ईदच्या नमाजपठणानंतर समाजबांधवांनी शिरखुर्मा तयार करुन आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला.
सामुहिक नमाजपठण : दाऊदी बोहरा बांधवांकडून ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 8:44 PM
सकाळी कुतुबी मशिदीमध्ये शहराचे बोहरा समाजाचे अमीलसाहेब अलहद युसुफभाईसहाब, अलहद मुस्तली भाईसाहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नमाजपठण करण्यात आले.
ठळक मुद्दे एकमेकांना अलिंगण देत शुभेच्छा दिल्याया समाजाचे सण उत्सव चंद्रदर्शनावर अवलंबून नसते दिनदर्शिका मिस्त्र कालगणनेवर आधारलेली