दोंडाईचा येथे झालेल्या दंगलीची पाहणी करण्यासाठी गेले असता मुंबईकडे परतताना त्यांनी शहरात गुलशेर डेपो येथे समाजवादी पक्षाचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय जैनू वायरमन यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यात आगामी महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्षातर्फे उमेदवार देणार असून मालेगावकरांनी एकदा समाजवादी पक्षाला संधी द्यावी, असे आवाहन केले. मालेगावच्या नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन करून अबू आझमी म्हणाले, सर्व मुस्लिमांनी एकत्रित येऊन आपल्या प्रश्नासाठी लढले पाहिजे. मालेगाव शहर सपा अध्यक्ष पदाबाबत युसूफ इलियास यांचेशी चर्चा करून त्यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी युनानी डॉक्टर्स असोसिएशनतर्फे बीयुएमएसच्या पदवीधारकांना सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. दिव्यांग सोसायटीनेही निवेदन सादर केले. यावेळी सपा प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांचे समवेत प्रदेश उपाध्यक्ष परवेज सिद्दीकी, धुळ्याचे नगरसेवक अमीन पटेल,मुंबईच्या शाजिया सदाफ अन्सारी, शरीफ मन्सूरी आदींसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो- ०८ अबू आझमी
मालेगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी.
===Photopath===
080421\08nsk_39_08042021_13.jpg
===Caption===
फोटो- ०८ अबू आझमी मालेगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी.