गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये जागा नाही, जागा मिळाली तर ऑक्सिजन नाही. अशी परिस्थिती झाल्याने राजे संभाजी स्टेडियम येथे सुमारे दोनशे खाटांच्या बेडची व्यवस्था महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून, येत्या दोन दिवसांत या ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याने मनपाच्यावतीने सांगण्यात आले आहे. नाशिक शहरासह या भागात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातच गोविंद नगर भाग हॉटस्पॉट बनला असून याठिकाणी मनपाच्यावतीने हॉटस्पॉट असलेल्या इमारतीमध्ये अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. सिडकोसह अंबड, चुंचाळे ही दाट लोकसंख्या असलेली वस्ती असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यात आहेत. यातील बहुतांशी नागरिक हे सर्वसाधारण असल्याने त्यांना खासगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य नसल्याने राजे संभाजी स्टेडियम येथील कोविड सेंटर हे रुग्णांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. शनिवारी स्थायी समितीचे सदस्य मुकेश शहाणे, मनपा अधिकारी ए. जे. काजी, गणेश जाधव, पवन कातकडे आदींनी संभाजी स्टेडियमला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
कोट
राजे संभाजी स्टेडियम येथे मनपाच्यावतीने २०० खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. याच ठिकाणी स्वखर्चातून २० बेडसाठी ऑक्सिजनची व्यवस्था स्वखर्चातून केली आहे. यामुळे या भागातील ऑक्सिजनची गरज असलेल्या अत्यावश्यक रुग्णांना याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था केली जाणार आहे.
-मुकेश शहाणे , नगरसेवक
(फोटो १० स्टेडीयम) - राजे संभाजी स्टेडियम येथील सेंटरची पाहणी करताना नगरसेवक मुकेश शहाणे. समवेत मनपा अधिकारी ए. जे. काजी, गणेश जाधव, पवन कातकडे आदी.