शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अग्निप्रतिबंधक उपाय नसल्याने दहा वर्षांत एकच कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 1:24 AM

सुरत येथील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमधील अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २००८ मध्ये यासंदर्भात शासनाने कायदा आणि नियम ठरवल्यानंतर केवळ डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्या महापालिकेने आजवर स्वागत हाइटस ही एकमेव इमारत वगळता कोणावरही कारवाई केलेली नाही.

नाशिक : सुरत येथील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमधील अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २००८ मध्ये यासंदर्भात शासनाने कायदा आणि नियम ठरवल्यानंतर केवळ डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्या महापालिकेने आजवर स्वागत हाइटस ही एकमेव इमारत वगळता कोणावरही कारवाई केलेली नाही. दरवर्षी फायर आॅडिट न केल्यास इमारती सील करण्याच्या जाहीर नोटिसा देण्यापलीकडे प्रशासन कोणतीही कृती करीत नसल्याने नाशिककरांची सुरक्षा वाºयावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.देशात कुठे काही दुर्घटना घडली की, राज्य शासन आणि महापालिकेला जाग येते. देशात यापूर्वी कोलकाता येथे एका रुग्णालयाला लागलेली आग, त्याचप्रमाणे तामीळनाडू पोषण आहार शिजवताना एका शाळेला लागलेली आग या दोन घटनांमध्ये अनेक निष्पांपाचे बळी गेल्यानंतर इमारतींसाठी अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी फायर सेफ्टी अ‍ॅक्ट २००८ च्या सुमारास तयार करण्यात आला. अलीकडेच सुरत येथील तक्षशीला कॉम्प्लेक्समध्ये कोचिंग क्लासेसला लागलेल्या आगीतून बचावण्यासाठी वीस विद्यार्थ्यांनी इमारतींवरून उड्या मारल्या आणि प्राण गमावले. त्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे.शासनाने फायर अ‍ॅक्ट केल्यानंतर अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना रहिवासी इमारती, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, शाळा-महाविद्यालये, रहिवासी मनोरे अशा सर्वच मिळकतींसाठी आवश्यक असल्या तरी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून केवळ हॉस्पिटल्सवरच दबाव टाकला जात आहे. अन्य संकुले किंवा मिश्र वापराच्या मिळकती आणि अन्य कोणत्याही मिळकतींना त्या तुलनेत बंधन घातले जात नाही.बंधक केवळ कागदोपत्रीच असते. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या वतीने संबंधित मिळकतींना फायर आॅडिट करून कारवाई करावी व त्यासंदर्भातील पूर्तता अहवाल अग्निशमन दलाला पाठवावा अन्यथा मिळकती सील केल्या जातील अशाप्रकारची नोटीस दिली जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्याने या नोटिसांना कोणीही गंभीर घेत नाही असे दिसत आहे.महापालिकेने आत्तापर्यंतच्या नोटिसा बजावल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात कामगारनगर येथील स्वागत हाइट या इमारतीवर एकमेव कारवाई केली आहे. मर्यादेपेक्षा ३५ सेंमी जास्त असलेल्या या इमारतीचा गेल्यावर्षी पाणीपुरवठा खंडित केला असून, या इमारतीतील रहिवाशांना अन्य ठिकाणाहून पाणी विकत घ्यावे लागत आहे. हा एकमेव अपवाद वगळता अग्निशमन सुरक्षितेचा विषय महापालिकेने फारसा गंभीर घेतला नाही. सुरक्षेचा प्रश्न कायम आहे.फक्त हॉस्पिटल्सच टार्गेटमहापालिकेने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वी केवळ वैद्यकीय व्यावसायिकांनाच टार्गेट केले आहे. रुग्णालयात अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास संबंधितांची हरकत नाही. मात्र २००८चा कायदा आणि त्यापूर्वीच्या इमारतींना लागू करण्यात आल्या. जुन्या मिळकतींमधील रुग्णालयांना अव्यवहार्य उपाय सांगण्यात आले. माफक उपाय करण्यास कोणाचीच हरकत नव्हती, मात्र जे शक्य नाही अशी साधने वापरण्यास सांगितल्याने वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेला दाद मागावी लागली आहे म्हणजे अंमलबजावणी सुलभ न केल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका