सटाणा : येथील सटाणा मर्चटस् को-ऑप बँकेने कोरोना काळात देखील आपल्या कामगिरीचा आलेख उंचावत ठेवला असून बँकेने प्रथमच आपल्या ठेवींचा १०० कोटींचा पल्ला ओलांडला असून सन २०१९-२० या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षणात बँकेस अ वर्ग प्राप्त झाला असल्याची माहिती सटाणा मर्चटस् को-ऑप बँकेचे चेअरमन कैलास हरिभाऊ येवला यांनी दिली. सटाणा मर्चटस् को-ऑप बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना येवला यांनी सांगितले की, ३ ऑगस्ट १९५७ साली समाजधुरीणांनी स्थापन केलेल्या बँकेस आज ६३ वर्ष पूर्ण झाली आहेत. बँकेचे अधिकृत भागभांडवल ५ कोटी असून वसूल भागभांडवल ३ कोटी ८ लक्ष इतके आहे. बँकेचा राखीव निधी १४ कोटी ६५ लक्ष असून २८ हजार ४९२ ठेवीदारांच्या सुमारे १०० कोटी ५० लक्ष रुपये इतक्या ठेवी आजअखेर आहेत. यावेळी व्हा. चेअरमन कल्पना येवला, संचालिका रूपाली कोठावदे, संचालक पंकज ततार, यशवंत अमृतकर, जगदीश मुंडावरे, जयवंत येवला, प्रवीण बागड, शरद सोनवणे, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे आदी उपस्थित होते.
समको बँकेस अ वर्ग प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:13 AM