समृद्धी महामार्ग हा इगतपुरी मतदाससंघातून ४०किमी इतका गेलेला असून, यात इगतपुरी मतदारसंघातील एकूण २३ गावे आहेत. मात्र या महामार्गाचे भूसंपादन होत असताना शेतकऱ्यांना रेडिरेकनरप्रमाणे भूसंपादनाची किंमत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना दर मान्य नसताना दबाव टाकून जमिनी खरेदी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. इगतपुरी तसेच नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील बागायती जमिनी कवडीमोल दराने संपादन केल्या आहेत. अनेक जमिनी या डीपीआर प्लॅनमध्ये असतानाही रास्त दर मिळालेला नाही. इगतपुरी तालुक्यातील एकूण ४५० हेक्टर भूसंपादन झालेले आहे. मात्र आजही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. महामार्गालगतचे सर्व्हिस रोड प्रचंड खराब झालेले आहेत.यावेळी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, लक्ष्मण गव्हाणे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, पांडुरंग वारुंगसे, अरुण गायकर, दौलतराव दुभाषे, वसंत भोसले, तोकडे, ज्ञानेश्वर कडू, भिका पानसरे, वाशीम सय्यद, अभय मोदी, समृद्धी महामार्गाचे अधिकारी तसेच आदींसह शेतकरी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाची राज्यमंत्र्यांकडून होणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 5:44 PM
नांदूरवैद्य : देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. मुंबई येथील आयोजित बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताचे व महत्त्वाचे मुद्दे मांडत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने पाऊल उचलण्यात येईल, असे सांगितले. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या समवेत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी लवकरच पाहणी दौरा करणार आहेत.
ठळक मुद्दे मुंबईत बैठक : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी