सिन्नर : प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या संयुक्त मोजणीला सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र विरोधात झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संयुक्त मोजणीचे काम बंद होते. गुरुवारपासून तालुक्याच्या पूर्व भागातील मºहळ बुद्रुक शिवारात संयुक्त मोजणीस प्रारंभ झाला.वावीचे मंडळ अधिकारी व्ही. व्ही. गोसावी, तलाठी हेमंत रितूपुरे, भूकर मापक संदीप टर्ले यांच्यासह कृषी, पाणीपुरवठा, बांधकाम, वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी मºहळ बुद्रुक येथे जाऊन दुपारी बारा वाजेच्या सुमारास संयुक्त मोजणीस प्रारंभ केला. सायंकाळपर्यंत मोजणीचे काम सुरू होते. दोन ठिकाणी शेतकºयांनी विरोध केल्याने ते गट सोडून अन्य ठिकाणी मोजणी करण्यात आल्याचे समजते. सुरुवातीस मºहळ बुद्रुक येथील शेतकºयांनी मोजणीला विरोध केला होता. त्यामुुळे सुमारे दीड किलोमीटर अंतराचे मोजणीचे काम अपूर्ण होते. मºहळ बुद्रुक येथे ५५ गट समृद्धीने बाधित होत असून, त्यात १०३ खातेदार आहेत.