सिन्नर : कांदा निर्यातबंदी हटविण्यासाठी दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील सर्व तालुक्यातील तहसीलदारांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून निवेदन देऊन कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ उठविण्याची मागणी करण्यात आली. निर्यातबंदी न उठविल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने १४ सप्टेंबर २०२० रोजी एक दिवसात कांदा निर्यातबंदी केली व कांदा आयात करून कांद्यासंदर्भाने एकापाठोपाठ एक निर्बंध घातले. परिणामी कांद्याचे बाजारभाव गडगडले. त्यामुळे उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच आता कांद्याचे दर प्रतिक्विंटलला सरासरी दोन हजार रुपयांच्या आसपास येऊन ठेपले आहेत. भाव कमी झाल्याने केंद्र सरकारने परदेशी कांदा आयात शंभर टक्के बंद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, तालुका कार्याध्यक्ष सुनील ठोक, युवा तालुकाध्यक्ष अशोक खुळे, नवनाथ बर्के, विलास सांगळे, सोपान कापडी, वामन सानप, सुदर्शन कापडी, कैलास ठोक, केशव कोकाटे, अशोक कर्डक, दिलीप कापडी, महेश खुळे, बाळासाहेब कापसे, संतोष कापडी, महेंद्र कापडी, शिवाजी कापडी, दिगंबर गिते आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - ०५ सिन्नर ओनियन
सिन्नर येथे तहसीलदार राहुल कोताडे यांना कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने निवेदन देताना भारत दिघोळे, संजय सानप, सुनील ठोक, अशोक खुळे, नवनाथ बर्के, विलास सांगळे, सोपान कापडी, वामन सानप, सुदर्शन कापडी यांच्यासह शेतकरी.
===Photopath===
051220\05nsk_17_05122020_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे तहसीलदार राहुल कोताडे यांना कांदा उत्पादक संघटनेच्यावतीने निवेदन देतांना भारत दिघोळे, संजय सानप, सुनील ठोक, अशोक खुळे, नवनाथ बर्के, विलास सांगळे, सोपान कापडी, वामन सानप, सुदर्शन कापडी यांच्यासह शेतकरी.